
15 ते 20 वर्षानंतर चंदनाचा बुंध्याचा घेर व त्यामधील तयार झालेला सुगंधी गर यावरती या झाडाची किंमत ठरते. तर उर्वरीत लाकडाला फर्निचरसाठी मोठी मागणी असते. पाटील म्हणाले, मोठ्या आर्थिक नफ्याच्या शेतीसाठी जोखीम ही मोठी असून सततच्या वाचनातून व शेतीविषयक माहिती देणाऱ्या कृषी विषयक मासिकामधून अभ्यास करून चंदन लागवडीचा प्रयोग केला आहे. या शेतीसाठी पत्नी उषा, पुतणे सचिन पाटील, कपिल व गौरव यांच्यासह कुटुंबियांच्या मदतीने चंदन शेतीचा नवा प्रयोग हाती घेतला आहे.
चंदनाच्या शेतीबद्दल माहीती देताना घोडीराम पाटील म्हणाले, अत्यंत साधारण मुरमाड जमीनीत अत्यल्प पाणी व विना खत औषधाशिवाय नैसर्गिकरित्या वाढणारी झाडे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीत प्रत्येक झाडामागे आजच्या बाजार भावात सरासरी 80 हजार ते 1 लाख रुपये उत्पन मिळते. चंदन लागवडीतून होणाऱ्या मोठ्या अर्थिक उत्पन्ना एवढी मोठी जोखीमही आहे. या लागवडीची नोंद महसूलव्या दप्तरी, वन विभागाकडे करावी लागते. त्याचा लेखा-जोखा अत्यंत काटेकोर ठेवावा लागतो. तर चंदन चौरापासून अत्यंत काळजी घ्यावी लागते.