Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali Politics: भाजपचा रथ रोखण्यासाठी सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; आजी-माजी खासदारांसोबत आखली खास रणनीती

महापालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती म्हणून सामोरे जाण्याची घोषणा केली होती. पण राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत भाजपची चर्चा जागा वाटपाच्या टप्प्यावर थांबली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 28, 2025 | 04:02 PM
Sangli Politics, Sangli Municipal Election, Ajit Pawar NCP

Sangli Politics, Sangli Municipal Election, Ajit Pawar NCP

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार राष्ट्रवादीची महाआघाडीकडे हालचाल
  • जागा वाटपावरून भाजप–राष्ट्रवादी मतभेद
  • महापालिका निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट
Sangali Politics: भाजपच्या महायुतीतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने नव्या आघाडीसाठी चर्चेची दारे खुली केली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांची शनिवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीसाठी मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना पाचारण करण्यात आले होते. विशेष म्हणजे आजी-माजी खासदार या बैठकीला उपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे या बैठकीला खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह परंपरागत विरोधक असलेले राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित दादा राष्ट्रवादी गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हेही बैठकीला उपस्थित होते. महाआघाडीसोबत अजितदादा राष्ट्रवादीच्या आघाडीच्या हालचाली गतीमान झाल्याने भाजपला धक्का बसणार आहे.

Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance: मोठी बातमी! महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस

महापालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती म्हणून सामोरे जाण्याची घोषणा केली होती. पण राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत भाजपची चर्चा जागा वाटपाच्या टप्प्यावर थांबली. त्यात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात मिरजेतील माजी महापौरसह अनेक नगरसेवकांनी प्रवेश केल्याने मिरजेतील भाजपची गणितेच बिघडली. त्यात राष्ट्रवादीने ३० जागांची मागणी करीत भाजपवर दबाव वाढविला होता. अखेर भाजप व राष्ट्रवादीने (अजित पवार) स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येण्याचा निर्धार केला. महाआघाडी म्हणून इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्या.

राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर सांगलीतील समीकरणेही बदलली आहेत. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटासोबत आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षही सोबत येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील हे आज सांगलीत दाखल झाले. त्यानंतर या हालचालींना वेग आला. मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुक तयारीचा आढावा घेतला. महायुती नको, स्वतंत्रच लढू या, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, संजय बजाज यांची मंत्री पाटील यांच्यासोबत आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत नवीन ट्विस्ट झाला असून नव्या आघाडीमुळे भाजपसमोर आव्हान उभे राहणार आहे.

Congress Politics: काँग्रेसमध्ये नेमकं चाललयं काय? दिग्विजय सिंहाना शशी थरूरांचे समर्थन; म्हणाले

पक्षातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते. ही आघाडीच्या चर्चेला काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम मात्र गैरहजर होते. ते सांगलीत नसल्याने बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीला खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह परंपरागत विरोधक असलेले राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित दादा राष्ट्रवादी गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हेही बैठकीला उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादी (अजित पवार) व महाआघाडीत जागा वाटपावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सेना-मनसे एकत्र येणार

शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसेची राज्यात युती झाली आहे. सांगलीतही हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. महाआघाडीसोबत शिवसेनेची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या मिळणाऱ्या जागेतून मनसेला जागा सोडल्या जाणार आहेत. जागा वाटपाची ही चर्चा फिस्कटल्यास सेना व मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातील, असे मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांनी सांगितले.

 

Web Title: Sangali politics to stop the bjps march both factions of the ncp have united in sangli a special strategy was devised with current and former mps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP

संबंधित बातम्या

ठाकरेंच्या शिवसेनेची गळती सुरुच; पुण्यातील बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
1

ठाकरेंच्या शिवसेनेची गळती सुरुच; पुण्यातील बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

Ambegaon Election News: आंबेगावात राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा; शिवसेनेला डावलल्यास बसू शकतो मोठा फटका
2

Ambegaon Election News: आंबेगावात राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा; शिवसेनेला डावलल्यास बसू शकतो मोठा फटका

सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
3

सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सर्वच पक्षांचे धोरण ‘वेट अँड वॉच’, आयाराम-गयाराम गॅसवरच! याद्याकडे सर्वांचं लक्ष
4

सर्वच पक्षांचे धोरण ‘वेट अँड वॉच’, आयाराम-गयाराम गॅसवरच! याद्याकडे सर्वांचं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.