मोठी बातमी! महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस (congress) यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भविष्यात राज्यातील इतर भागांमध्येही काँग्रेस आणि वंचित यांची युती होण्याची शक्यता असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. मुंबईसाठी काँग्रेसने वंचितला ६२ जागा दिल्या असून, काँग्रेस स्वतः १५६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस–वंचित आघाडीमुळे महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्याने दलित, वंचित आणि अल्पसंख्याक मतदारांवर प्रभाव पडू शकतो. या युतीच्या घोषणेमुळे महायुती तसेच महाविकास आघाडीच्या रणनीतींवरही परिणाम होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, काँग्रेससोबत युतीच्या चर्चेसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना अधिकार देण्यात आले होते. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व इतर नेत्यांनी युतीची बोलणी केली. दरम्यान, मुंबई महापालिकेतील काही जागांसाठी वंचितकडून आग्रह धरला जात होता, पण यावरही निर्णायक चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांचे नेते रविवारी दुपारी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. ही आघाडी केवळ मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केल्याने त्याचा मोठा प्रभाव मुंबई महापालिका निवडणुकीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Congress Politics: काँग्रेसमध्ये नेमकं चाललयं काय? दिग्विजय सिंहाना शशी थरूरांचे समर्थन; म्हणाले…
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आघाडीचा निर्णय झाला असला, तरी इतर महापालिकांबाबत अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडीचे अधिकार देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील इतर काही महापालिकांमध्येही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आघाडीचा राज्यातील राजकीय समीकरणांवरही लक्षणीय परिणाम होऊ शकतो. दरम्यान, मुंबई महापालिकेत काँग्रेससोबतच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला ६२ जागा येणार असल्याचे समजते.






