Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kupwad Double Murder Case: कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक; सांगली-कुपवाडमध्ये बंदची हाक

ईश्वरपूर, सवळजसह विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचार, धार्मिक तेढ व बेकायदेशीर बांधकामांच्या तक्रारींबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. गुंठेवारीमुळे निर्माण होणाऱ्या वादांबाबत पालकमंत्री बैठक घेणार असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 19, 2026 | 01:51 PM
Sangli News, Crime News, Gopichand Padalkar, Local Politics,

Sangli News, Crime News, Gopichand Padalkar, Local Politics,

Follow Us
Follow Us:
  • कुपवाड घटनेच्या निषेधार्थ २१ ऑगस्ट रोजी सांगली-कुपवाड शहर बंद व निषेध मोर्चाचे आवाहन.
  • आरोपी फरीद शेखवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी.
  • १५ ऑगस्टच्या हल्ल्यात मनीषा केसरेकर व उपचारदरम्यान पती मोहन केसरेकर यांचा मृत्यू.
Kupwad Double Murder Case:  कुपवाड येथे दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध करत आरोपी फरीद शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि फाशीची शिक्षा द्यावी, या मागणी साठी या घटनेच्या निषेधार्थ २१ ऑगस्ट रोजी सांगली-कुपवाड शहर बंद आणि मोर्चा काढला जाणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नितीन चौगुले, नाना वाघमारे उपस्थित होते.

कर्नाटकातील हेब्बाळ येथील केसरेकर कुटुंब कुपवाडमध्ये वास्तव्यास होते. मोहन केसरेकर हे बांधकाम क्षेत्रात मजुरीचे काम करून नुकतेच कष्टाने बांधलेल्या घरात राहण्यास आले होते. शेजारी राहणाऱ्या आरोपीकडून या कुटुंबाला सातत्याने त्रास व शिवीगाळ केली जात होती, असा आरोप पडळकर यांनी केला. १५ ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या सुमारास आरोपीने मनीषा केसरेकर यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. मुलगा व मुलगी घराला कडी लावल्याने बचावले. गंभीर जखमी मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

Maharashtra Politics: मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार! महायुती सरकारच्या नव्या नियमावलीने मंत्रिमंडळात खळबळ

आरोपीला तातडीने शोधून अटक केल्याबद्दल पडळकर यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. सरकारी वकील म्हणून हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करावी, तसेच दोन्ही मुलांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मुलांचे आजी-आजोबा वृद्ध असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे शासनाने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय नोकरी देण्याचा विचार करावा, असेही पडळकर म्हणाले.

या घटनेच्या निषेधार्थ २१ ऑगस्ट रोजी सांगली-कुपवाड शहर बंद ठेवून शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार संग्राम जगताप व महेश लांडगे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पडळकर यांनी केले.

ईश्वरपूर, सवळजसह विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचार, धार्मिक तेढ व बेकायदेशीर बांधकामांच्या तक्रारींबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. गुंठेवारीमुळे निर्माण होणाऱ्या वादांबाबत पालकमंत्री बैठक घेणार असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.

नितीन चौगुले यांनी सर्वसामान्य हिंदूंनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच अनधिकृत बांधकामांना परवानग्या व वीज जोडणी कशी मिळाली, याची चौकशी करण्याची मागणी केली. अशा घटनांबाबत मुस्लिम समाजातील जबाबदार घटकांनीही भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

Gas Cylinder: स्वयंपाकघरातील टेन्शन आता खल्लास! नव्या सरकारी योजनेतून घरात पोहचणार गॅस, होणार स्वस्त

‘हिंदूंनी जागृत होण्याची गरज’

धार्मिक आरक्षणाचा लाभ घेत असताना धार्मिक परिवर्तन करून वेगळा धर्म पाळणाऱ्यांबाबत शासनाने कायदेशीर चौकशी करावी. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात हिंदूंनी जागृत होण्याची गरज आहे, असे पडळकर म्हणाले. त्यांनी काश्मीरमधील लोकसंख्येतील बदलाचा संदर्भ देत धार्मिक लोकसंख्येतील बदल गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली.

‘गुन्हेगारांवर कडक कारवाई करा’

सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. गरज भासल्यास अशा गुन्हेगारांवर एन्काऊंटरसारखी कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांना कठोर कारवाईचे प्रशिक्षण देण्यासाठी उत्तर प्रदेशात पाठवावे आणि सांगलीतही गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका घ्यावी, असे पडळकर म्हणाले.

 

Web Title: Sangli newsgopichand padalkar demands death penalty in kupwad double murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • crime news
  • gopichand padalkar
  • sangli news

संबंधित बातम्या

सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई
1

सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई

तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
2

तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले
3

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या
4

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.