Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Poisoning: मोठी बातमी! वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्रात सुमारे ६५ जणांना विषबाधा, जाणून घ्या

रात्री कुंडल वनप्रबोधिनी मध्ये स्थानिक प्रशिक्षणार्थी व अमरावतीहून आलेले प्रशिक्षणार्थी या सर्वांनाच शाकाहारी व मांसाहारी जेवण केले होते.  एकूण जवळपास पाचशे जणांनी जेवण केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2025 | 02:35 AM
Food Poisoning: मोठी बातमी! वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्रात सुमारे ६५ जणांना विषबाधा, जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

पलूस: कुंडल ( ता. पलूस ) येथील वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्रात सुमारे ६५ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील रुग्णांवर पलूस येथील ग्रामीण रुग्णालय व कुंडल येथील आरोग्य मंदिर  तसेच सांगलीच्या शासकीय रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. वनप्रशिक्षण केंद्र, चिखलदरा ( अमरावती) येथील ११० प्रशिक्षणार्थी व सहाय्यक व इतर अधिकारी ८ असे ११८ जण कुंडल येथील वन अकॅडमीला भेट देणेसाठी सोमवारी संध्याकाळी आले होते.

तत्पूर्वी त्यांचा दिनांक १७ फेब्रुवारीपासून संभाजीनगर, जुन्नर, ओझर, बनेश्वर येथील वनउद्यान, इकोबटालीयन प्लांटेशन, रोपवाटीका, बिबट्या उपचार केंद्र व तत्सम ठिकाणी भेट देऊन बनेश्वर (ओझर) येथून सोमवारी सकाळी निघाले होते. निघताना दुपारच्या जेवणाचे पार्सल बरोबर घेतले होते. ते सर्वांनी दुपारी रस्त्यामध्ये खाल्ले त्यानंतर ते संध्याकाळी कुंडलमध्ये आले येथून आज पुढे राधानगरी येथे जाणार होते.

रात्री कुंडल वनप्रबोधिनी मध्ये स्थानिक प्रशिक्षणार्थी व अमरावतीहून आलेले प्रशिक्षणार्थी या सर्वांनाच शाकाहारी व मांसाहारी जेवण केले होते.  एकूण जवळपास पाचशे जणांनी जेवण केले मात्र त्यापैकी फक्त अमरावतीहुन आलेल्याच प्रशिक्षणार्थीं पैकी काहींना पहाटे जुलाब, व उलट्यांचा त्रास सुरु झाला  तात्काळ कुंडल येथील आरोग्य उपकेंद्र मध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पाटील व त्यांच्या पथकाने तात्काळ अन्नातील विषबाधित रुग्णावर उपचार सुरु केले. व गंभीर असलेल्या नेहा पिंगळे, समिका मंचेकर, स्नेहल शिंदे, अरुणा झुंबे, ज्ञानेश्वरी शिंदे, गीता कोकणे, पद्मिनी शिंदे, अंकिता गोपन यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पलूस ग्रामीण रुग्णालयात २१ जणांना दाखल केले आहे. व कुंडल येथील आरोग्य उपकेंद्र मध्ये अरुण सिंगल, निलेश सोळंके, लक्ष्मी उईके, व्यंकटेश शिंदे, ज्योतीराम शेळके, जयपाल टेकनोट, चेतन वाघमारे, संजय धर्माधिकारी, सुशील सोनवणे, मिथुन राठोड, सोनाली पावरा, सोनल सांगळे, प्रदीप कोराडे, भूमिका भोई, वैशाली चव्हाण, जालिंदर थोरात, अनिल बोडके, सागर परदेशी, महेश पाटील, अभिजीत पाटील, अजय गायकवाड, ऋषिकेश लवाटे, सागर काळे, नारायण उगले, सुभाष गायकवाड , प्रकाश वाघमारे, प्रभाकर चिकाटे, गोरक्ष भांबरे, हिराचंद्र बोरे, ऋषिकेश ढाकणे, अभिषेक खांबे, सेजल परदेशी, पंढरीनाथ खताळे, लक्ष्मीकांत हिंगे, नंदकिशोर सोळंकी, प्रीत जाधव, नितीन नवघरे, सायली टोणपे, सोनाली हासे असे ३९ जण वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली उपचार घेत आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश जुगळे व आरोग्य पर्यवेक्षक कुलदीप डुकरे यांनी कुंडल येथील आरोग्य मंदिरास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कुंडल येथे उभारण्यात आलेल्या वन प्रबोधिनी मध्ये सदर घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना आत सोडण्यास अटकाव करण्यात आला. याठिकाणी कोणीही अधिकारी हजर नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Sangli palus kundal forest department trainee food poisoning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • food poisoning news
  • Health News
  • sangli news

संबंधित बातम्या

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान
1

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ! १०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुर
2

रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ! १०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुर

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी
3

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी

खाजगी कंपनीत मोठी दुर्घटना; ड्रेनेज टाकीत गुदमरून तिघांचा मृत्यू, पाच जण जखमी
4

खाजगी कंपनीत मोठी दुर्घटना; ड्रेनेज टाकीत गुदमरून तिघांचा मृत्यू, पाच जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.