Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी प्रचंड अडचणीत, अतिवृष्टीच्या मदतीचे पैसे कापू नका; संजय पाटलांची जिल्हा बँकेकडे मागणी

सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी माजी खासदार संजय पाटील यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 07, 2025 | 01:34 PM
शेतकरी प्रचंड अडचणीत, अतिवृष्टीच्या मदतीचे पैसे कापू नका; संजय पाटलांची जिल्हा बँकेकडे मागणी

शेतकरी प्रचंड अडचणीत, अतिवृष्टीच्या मदतीचे पैसे कापू नका; संजय पाटलांची जिल्हा बँकेकडे मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • सांगली जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत
  • अतिवृष्टीच्या मदतीचे पैसे कापू नका
  • संजय पाटलांची जिल्हा बँकेकडे मागणी

सांगली : सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत; जुन्या कोणत्याही कर्ज वसुलीसाठी किंवा थकीत बाकीसाठी हे पैसे कापून (कटिंग करून) घेऊ नयेत, अशी मागणी माजी खासदार संजय पाटील यांनी केली आहे. सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत असून, त्यांची आणखी परीक्षा पाहू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. माजी खासदार संजय पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची बँकेत भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, यासाठी माजी खासदार पाटील यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले होते. पंचनाम्यांसाठी गावोगावी जाऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या या लढ्याला यश मिळाले असून, संबंधित विभागाने सांगली जिल्ह्यासाठी १४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

बँक खात्यात पैसे जमा, पण वसुलीची भीती

मदतीचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला बँकांनी शेतकऱ्यांचे हे मदतीचे पैसे त्यांना न देता, त्यांच्या इतर थकीत बाकीसाठी जमा करून घ्यायला सुरुवात केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची भेट घेऊन या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला. त्यांनी वाघ यांना ही बाब निर्देशास आणून देत, मदतीच्या पैशांचे ‘कटिंग’ न करण्याची मागणी केली.

सध्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देऊ शकत नाही. त्यांना फक्त मदत दिली आहे. त्यात ही जर बँकांनी अशा पद्धतीने पैशाची वसुली चालू केली तर शेतकऱ्यांची परिस्थिती अजून वाईट होईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे आलेले मदतीचे पैसे त्यांना मिळाले पाहिजेत, यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली. -संजय पाटील माजी खासदार

Web Title: Sanjay patil has made an important demand for farmers from the district bank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • sangli news
  • sanjay patil

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”;  राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा
1

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

ऊस दरावर तोडगा नाहीच, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ; कारखान्यांना पाच दिवसाची मुदत
2

ऊस दरावर तोडगा नाहीच, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ; कारखान्यांना पाच दिवसाची मुदत

पुणे जिल्ह्यातील बोगस दिव्यांग शिक्षकांची नावे जाहीर, कारवाई कधी करणार? प्रहार संघटनेचा सवाल
3

पुणे जिल्ह्यातील बोगस दिव्यांग शिक्षकांची नावे जाहीर, कारवाई कधी करणार? प्रहार संघटनेचा सवाल

यात्रेत गोंधळ घालण्याचा कट उधळला; यवत पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
4

यात्रेत गोंधळ घालण्याचा कट उधळला; यवत पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.