फोटो सौजन्य सोशल मिडिया
Shri @DevenBhartiIPS ji
आपल्या माहिती साठी! pic.twitter.com/7t56RIbECG — Sanjay Raut (@rautsanjay61) September 20, 2026
साउथ झोनचे ट्राफीक पोलिस अधिकारी हेमराज राजपूत यांच्या मार्फत घडलेल्या घटनेचे चित्रिकरण झाल्याचे तेथिल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न पांडे हे सामाजिक कार्यकर्ते असून मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जागेवर जाऊन शिवीगाळ व धमकी दिली एवढेचं नाही , उपस्थित महिलांशी असभ्य वर्तन करण्यात आले, तर महिलांकडुन मोबाईल फोन खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहले आहे. पालिका निवडणुकीत येथिल मंडळाने मकरंद नार्वेकर यांना समर्थन नकेल्या मुळे झोनचे ट्राफीक पोलिस अधिकारी हेमराज राजपूत यांनी हा घृणास्पद आणि बेकायदेशीर वर्तन केले आहे. हा सर्व प्रकार संजय राऊत यांनी पत्रात केला आहे.
साउथ झोनचे ट्राफीक पोलिस अधिकारी हेमराज राजपूत यांंनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जागेवर जाऊन शिवीगाळ व धमकी दिली, एवढेचं नाही तर उपस्थित महिलांशी असभ्य वर्तन केले. महिलांकडुन मोबाईल फोन खेचण्याचा प्रयत्न केला. कुलाबा विभागात इतर सुद्धा गणेश मंडळ आहेत. पण कुलाबा पास्ता लेन येथिल बाल गोपाल मित्र मंडळ यांच्या डोळ्या खुपला ही आर्श्ययाची बाब आहे. असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या कडे लेखी तक्रार देऊन घडलेल्या घटनेची चौकशी करावी. मंडळाचे पदाधीकारी कार्यकर्ते हे दहशती खाली आहेत. त्यांच्या मध्ये भितीचे वातावरण आहे. तसेच उत्सवाला कोठेही गालबोट लागता कामा नये अशी भिती मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आहे.






