महापालिका निवडणुकीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, आता आम्ही...
पुणे : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठं अपयश मिळालं आहे.अस असताना आत्ता येत्या काही महिन्यात महापालिका निवडणूक होणार आहे. आणि या निवडणुकीसाठी देखील आत्ता सर्वच पक्षांनी तयारी केली असता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की महापालिकेच्या निवडणुकीच्यासाठी शिवसैनिकांची स्वबाळाची इच्छा असल्याचं म्हणत मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर तर इतर महापालिका महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचा दावा यावेळी राऊत यांनी केला आहे. पुण्यात आज शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असतं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
ते पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्त्वाचा फॅक्टर असून काहीही करून आम्हाला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची आहे नाहीतर मुंबई वेगळी होईल. ज्या पद्धतीने मराठी माणसावर हल्ले सुरू आहे ते पाहिलं तर आम्हाला मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची आहे. असं यावेळी राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, नुकतच ईव्हीएम ने सगळ्यांचेच निकाल लावले आहे. लोकसभेच तसेच विधानसभेच निकाल अधिवेशन संपलं आहे. आत्ता सरकारच्या मनात आलं तर महापालिका निवडणुका होतील आणि यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येत आहे. कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज बैठक बोलाविण्यात आली आहे. विधानसभेचा जो काही निकाल लागला आहे त्याबाबत आता पुढे गेलं पाहिजे. आत्ता जी काही निवडणूक झाली आहे ती आम्ही गेल्या ७० वर्षात कधीच पहिली नाही. या निवडणुकीत लाखोच्या संख्येने लोकांनी आम्हाला मतदान केल पण ते आम्हाला मिळालं नाही. यामुळे नागरिकांमध्ये चीड आहे.अस यावेळी राऊत म्हणाले.
महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार का याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीत अजून आहोत. आम्ही भाजपसोबत महायुतीत असताना देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावर लढल्या आहे. महापालिका निवडणूक तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणूक या स्वबळावर लढाव्या अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. विधानसभेत देखील काही जागा आम्हाला वाटत होत्या की, त्या लढाव्या आणि त्यांनी जिंकू शकतो. पुणे जिल्ह्यातील खेड मधील जागा देखील आम्ही शेवटच्या टप्प्यात आमच्याकडे घेतली. आणि ती जिंकली. जुन्नरची जागा देखील आम्ही लढलो असतो तर जिंकलो असतो. पण निवडणुकीत जेव्हा आघाडी असते तेव्हा अश्या गोष्टी होत असतात. असं यावेळी राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन नक्षलवाद बाबत जे विधान केलं आहे त्याबाबत राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, फडणवीस हे खोटं बोलत आहे. भारत जोडो यात्रेत अनेक जण सहभागी झाले होते अनेक रिटायर आर्मी ऑफिसर असतील सामाजिक संस्था असतील तसेच विविध पक्षातील नेते मंडळी असतील हे देखील भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी झाले होते मग हे सगळे अर्बन नक्षलवादी आहेत का? असा सवाल यावेळी राऊत यांनी केला.