Sanjay Raut PC:
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वैयक्तिक कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर आता ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चा आणखी दाट होत चालल्या आहेत. अशातच संजय राऊत यांनी ठाकरें बंधुंच्या युतीसंदर्भात आणि राज्यातील आागामी महापालिका निवडणुकांसंदर्भातही महत्त्वाची भूमिका मांडली आहे . उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची लाकली भेट ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची होती. गेल्या तीन महिन्यातील ठाकरे बंधुंची ही पाचवी भेट आहे. असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.
आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच युतीची घोषणा करणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात 27 महापालिका आहे. हा काही खेळ नाही. प्रत्येक जागेवर, पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे. प्रत्येक महापालिकेची परिस्थिती वेगळी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सगळीकडे परिस्थिती वेगवेगळी आहे. या सगळ्यावर आमच्या चर्चा होत आहेत. प्रत्येक महापालिकेत दोन्ही पक्षांचे प्रमुख लोक चर्चा करत आहेत. ही भेट आणि चर्चांमुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे.
संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक या महापालिकांमध्ये एकत्र लढण्याबाबत एकमत आहे. याशिवाय इतरही अनेक महापालिकांध्येही शिवसेनेची सत्ता होती. त्याठिकाणी मनसेची कुठे मदत घेता येईल का, ज्याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, तिथे त्यांचीही मदत घेण्याबाबत विचार सुरू आहे. मुंबईच महापौर मराठीच होईल, मराठी बाण्याचा माणूस होईल, मराठी बाण्याचा म्हणजे भाजप किंवा मिंधे सांगतात, तसे दिल्लीचे जोडे उचलणारा मुंबईचा महापौर होणार नाही. हुतात्मा चौकात जाऊल आमच्या १०५ हुतात्मांसमोर दंडवत घालेल असा महापौर होईल.असा बाणा फक्त शिवसेना आणि मनसेतच आहे. होईल तर तो आमचाच महापौर होईल. आमचा म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह मी म्हणतो आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
AFG vs BAN : बांग्लादेशने अफगाणिस्तानला केलं क्लीन बोल्ड! कर्णधार जाकेर अलीने केली एक मोठी कामगिरी
महाविकास आघाडी शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे, त्यात नवा पक्ष येणार असेल तर आम्ही विचार करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित वेगळ असतं. महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत. हे राज ठाकरेंना सांगण्याचा माझ्या एकट्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. आत्ता शिवसेना आणि मनसेच्या चर्चा सुरु आहेत आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांशींही आमचे उत्तम संबंध आहेत. मविआच्या नेत्यांचेही राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
“महायुती हे काय झेंगाट काय? शिंदे वगैरे काही शिवसेना नाही. शिंदे म्हणजे अमित शाह यांची कंपनी आहे. अजित पवारांचा पक्षही कंपनी आहे, ती पण अमित शाह यांचीच आहे. मुख्य कंपनी भाजपा आहे. बेनामी प्रॉपर्टी अमित शाह यांच्या आहेत. अमित शाह यांना वाटलं की त्या कंपन्या बंद होतील.” राऊतांनी पुढे सांगितले की, “महाविकास आघाडी खरी आहे आणि शिवसेना–मनसे युती खरी आहे.”
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका केली. पूरग्रस्तांच्या मदतीच्या प्रकरणावर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार दोघांवरही प्रश्न उपस्थित केले. “ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुरखा फाडला आणि ते तोंडावर आपटले. मुख्यमंत्र्यांनी अजून केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवलेला नाही. सरकारने घाईने मदतीसाठी पाऊले उचलली पाहिजेत. जरी राज्य सरकारने मदतीचा प्रस्ताव पाठवला नसला तरीही महाराष्ट्र हा भारताचा एक भाग आहे. पूर्वी गुजरातला मदत केली आहे; महाराष्ट्रालाही मदत मिळाली पाहिजे.” असंही राऊतांनी नमुद केलं.
भाजपा शेतकरी विरोधी, अमित शाह महाराष्ट्रात आले पण…; काँग्रेसच्या नेत्याचा हल्लाबोल
राऊत यांनी आरोप केला की, “विमानात बसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी हजारो कोटींचा निधी जाहीर केला. महाराष्ट्राबाबत तुमच्या मनात कोणता राग आहे? एवढा द्वेष का आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, राजन तेली प्रकरणावर राऊतांची गंभीर टीका
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतील कर्ज घोटाळ्याबाबत राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून प्रकरण ईडीकडे सोपवले पाहिजे. कोकणातील अनेक सहकारी बँका अनेक वर्षे राणेंच्या ताब्यात आहेत, पण या बँका कोण लुटत आहे हे दिसत नाही का? राजन तेलींनी लिहिलेले पत्र मी वाचला आहे. त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. पोलिस महासंचालक आणि रश्मी शुक्ला यांनी तत्काळ ॲक्शन घ्यावी , अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली.