फोटो सौजन्य - Bangladesh Cricket
Afghanistan vs Bangladesh 3rd T20 : आशिया कप २०२५ नंतर, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात आली. अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये तीन सामन्यांची t20 मालिका पार पडली. या मालिकेमध्ये अफगाणिस्तानच्या संघाची फारच निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. या मालिकेचा शेवटचा सामना काल पार पडला या सामन्यांमध्ये बांगलादेशच्या संघाने अफगाणिस्तान विरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवून मालिका नावावर केली आहे. जाकिर अली याला बांगलादेश संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले होते. तर अफगाणिस्तानचे कर्णधारपद हे राशीद खानकडे होते.
पहिल्या सामन्यांमध्ये बांगलादेशच्या संघाने आठ चेंडू शिल्लक असताना चार विकेट्सने विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने दोन विकेट्सने विजय मिळवला होता. परवेझ इमान आणि तांजिद हसन यांनी पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. या मालिकेत अफगाणिस्तानची कामगिरी खूपच खराब होती, ज्यामुळे संघ मालिकेत एकही सामना जिंकू शकला नाही. बांगलादेशने तिसरा टी२० सामनाही जिंकला आणि मालिकेत अफगाणिस्तानला ३-० ने व्हाईटवॉश केले. बांगलादेश क्रिकेटच्या इतिहासात ही चौथी वेळ आहे जेव्हा संघाने एखाद्या संघाला क्लीन स्वीप केले आहे.
Etisalat Cup Champions! 🏆🇧🇩Bangladesh complete a flawless 3-0 series sweep over Afghanistan. Glory to the Tigers!#Bangladesh #TheTigers #BCB #Cricket #BANVSAFG #Cricket #TigersForever #BANVSAFG2025 #BANvAFG pic.twitter.com/qmc7A7ICVa — Bangladesh Cricket (@BCBtigers) October 6, 2025
या मालिकेत, झाकीर अलीच्या नेतृत्वाखाली, बांगलादेश संघाने शानदार कामगिरी केली, ज्यामुळे संघाला उत्तम निकाल मिळाला. अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेचे आयोजन केले होते, सर्व सामने युएईमध्ये खेळले गेले होते. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत नऊ गडी गमावून १४३ धावा केल्या. या सामन्यात अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना दरविश रसूलीने सर्वाधिक ३२ धावा केल्या. सेदिकुल्लाह अटलनेही २३ चेंडूत २८ धावा केल्या.
India vs Pakistan : मुनीबा अलीसोबत न्याय की अन्याय? जाणून घ्या धावबाद होण्याबाबत आयसीसीचा नियम
बांगलादेशकडून गोलंदाजी करताना शेफुद्दीनने तीन षटकांत फक्त १५ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. नसुम अहमद आणि तन्झिम हसन शाकिबनेही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. बांगलादेशने १८ षटकांत ४ गडी गमावून १४४ धावांचे लक्ष्य गाठले. बांगलादेशकडून फलंदाजी करताना शैफ हसनने सर्वाधिक ३८ चेंडूंत २ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या. तन्झीम हसननेही ३३ चेंडूंत ३३ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना मुजीब उर रहमानने ४ षटकांत २६ धावा देत २ बळी घेतले.