Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: फडणवीसांच्या ‘त्या’ गर्जनेचे आता काय झाले? मराठी भाषा सक्तीवरून संजय राऊतांचा खोचक सवाल

केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या वादावर बोलताना राऊत यांनी उद्योगपती लोढा यांच्यावर निशाणा साधला. “केईएम रुग्णालय हे कोणत्याही खासगी व्यक्तीने बांधलेले नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 28, 2026 | 01:49 PM
Sanjay Raut slams Mahayuti Government, financial dealing in Vidhan Parishad Election, Vidhan Parishad Election, Mahayuti Government,

Sanjay Raut slams Mahayuti Government, financial dealing in Vidhan Parishad Election, Vidhan Parishad Election, Mahayuti Government,

Follow Us
Follow Us:
  • मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले
  • शहरात रोजीरोटी मिळवण्यासाठी येणाऱ्या लोकांनी स्थानिक भाषेचा आदर केला पाहिजे- संजय राऊत
  • लोढा यांच्यावर आरएसएसचा अजेंडा पुढे नेण्याचा आरोप
Sanjay Raut News: राज्यात मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना तिच्यासाठी स्वतंत्र कायदा करावा लागणे हीच चुकीची बाब असून, तो कायदा करूनही काही जण तो मान्य करण्यास तयार नसतील तर ते राज्यासाठी योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

रिक्षाचालकांना मराठी येणे आवश्यक असल्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, शहरात रोजीरोटी मिळवण्यासाठी येणाऱ्या लोकांनी स्थानिक भाषेचा आदर केला पाहिजे. प्रवासी बहुसंख्य मराठी भाषिक असल्याने भाषेअभावी गैरसमज, वाद आणि मारामाऱ्या होतात. त्यामुळे स्वतःच्या सोयीसाठी मराठी शिकणे गरजेचे आहे. मात्र, या मुद्द्यावर सरकारलाच आव्हान देण्याची भाषा केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “मराठीच्या मुद्द्यावर सरकारला आव्हान म्हणजे महाराष्ट्रालाच आव्हान,” असे ते म्हणाले.

Amit Thackeray : …तर रस्त्यावर उतरून मारू; अमित ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वीच्या “महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची” या घोषणेची आठवण करून दिली. “त्या गर्जनेचे आता काय झाले? सरकारने स्पष्ट कायदे व नियम करावेत आणि मराठी न येणाऱ्यांना सहा महिन्यांची मुदत देऊन भाषा शिकण्याची संधी द्यावी,” सरकार मराठीच्या मुद्द्यावर मागे हटत असेल, तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

केईएम रुग्णालय नामांतर वादावर लोढांवर टीका

केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या वादावर बोलताना राऊत यांनी उद्योगपती लोढा यांच्यावर निशाणा साधला. “केईएम रुग्णालय हे कोणत्याही खासगी व्यक्तीने बांधलेले नाही. अनेक वर्षांपासून ते जनतेची सेवा करत आहे आणि त्या नावाला ऐतिहासिक ओळख आहे,” असे ते म्हणाले.

लोढा यांच्यावर आरएसएसचा अजेंडा पुढे नेण्याचा आरोप करत, संजय राऊतांनी लोढा यांच्या बांधकाम प्रकल्पांतील इंग्रजी नावांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जर गुलामीची प्रतीके हटवायची असतील, तर सर्वप्रथम स्वतःच्या प्रकल्पांतील ‘ट्रम्प’सारखी नावे बदलून छत्रपती शिवाजी महाराज किंवा भारतीय संस्कृतीशी निगडित नावे द्यावीत,” असा टोला त्यांनी लगावला.

या मुद्द्यावर शिवसेनेने आंदोलन केल्याचे सांगत, स्थानिक आमदार अजय चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती त्यांनी दिली. “प्रथम स्वतःपासून सुरुवात करा, त्यानंतरच आम्ही तुमच्या प्रस्तावाचा विचार करू,” असे राऊत म्हणाले.

मोठी बातमी! ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध

विधान परिषद निवडणुकीवर भाष्य

विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची विनंती काही नेत्यांनी केली आहे. महाविकास आघाडीला विधिमंडळात सक्षम नेतृत्व मिळावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. “अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. ते पक्षप्रमुख असून परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय करतील. आमची इच्छा असली तरी त्यांचा निर्णय महत्त्वाचा असेल,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Sanjay raut reminds devendra fadnavis of previous promises over marathi language implementation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 01:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.