‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध, संजय गायकवाडांविरोधात आंदोलनस्थळी गोंधळ
आमदार संजय गायकवाड यांनी विचारले, ‘शिवाजी कोण होते?’ या पुस्तकातील शिवाजी महाराजांच्या केवळ एकेरी उल्लेखावरून प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचा निषेधार्थ आज रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच संजय गायकवाड यांच्या घरासमोर ‘शिवाजी कोण होते?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार होते. या सगळ्यात प्रशांत आंबी,अजित नवले, बी. जी. कोळसे पाटील आणि सोबत कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध जिल्ह्यांचे अधिकारी सहभागी करणार होते. सध्या, विविध जिल्ह्यांतून ५०० हून अधिक पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते बुलढाणा येथे पोहोचले आहेत. मात्र, पोलिसांनी प्रशांत आंबी यांना अटक करून कारवाई सुरू केली आहे. शेतकरी नेते अजित नवले यांनी या गोष्टीवर निषेध केला असून शिवाजी कोण होता? पुस्तकप्रश्नी आयोजित केलेल्या सभेचा मंडप ठेकेदाराला काढायला लावण्यात आला आहे.
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीची मागणी; साताऱ्यात संघटनांचे तीव्र आंदोलन
आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर डाव्या विचारांच्या संघटनांनी आंदोलन छेडले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘स्थानबद्ध’ म्हणजे महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत दिली जाणारी प्रतिबंधात्मक शिक्षा. यामध्ये गुन्हेगाराला तुरुंगात डांबता येते. मटका, वेश्या व्यवसाय, तस्करीसारख्या अवैध धंद्यांत वारंवार गुंतलेल्या व्यक्तींना या अंतर्गत 6 महिने ते 1 वर्षासाठी न्यायालयीन सुनावणीशिवाय कारागृहात ठेवता येईल.
यापूर्वी केवळ सार्वजनिक शांतता भंग करणार्या सराईत गुन्हेगारांनाच महाराष्ट्र प्रतिबंधक कारवाई अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करता येत होते; मात्र आता मटका, जुगार, बेकायदा लॉटरी, वेश्या व्यवसाय, मानवी तस्करी आणि इतर तत्सम अवैध धंदे करणार्यांनाही या अधिनियमाच्या कक्षेत आणण्यात आले आहे. राज्यभर या सुधारित कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पोलिस प्रशासनासाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरत आहे.






