मुंबई : जर एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरा असे जर प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल तर त्यांना कायदा आणि लोकांच्या भावनेचा अभ्यास करावा लागेल. तसं म्हटलं तर रामदास आठवले यांचाही पक्ष तसा ताकदीचा आहे. पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे असे अनेक पक्ष तयार होतात, कोणीतरी त्याला पाणी घालतात आणि कालांतराने ते नष्ट होतात,” अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे. ते दिल्लीत बोलत होते.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे त्यांचा स्ट्राईक रेट वाढवला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यावरून संजय राऊत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आम्ही म्हणालो रामदास आठवलेंचा पक्ष खरा आहे, तर त्यांना किती वेदना होतील, असा सवालही त्यांनी विचारला. तसेच. आम्हाला यातना होत नाही. अशी वक्तव्ये होत असतात. पण प्रकाश आंबेडकरच ड़. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत त्यांनी तो वारसा पुढे चालवायला हवा,असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
आमदार अपात्रता सुनावणी बाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. आजच्या सुनावणीबाबत आम्ही आशावादी आहोत. विधानसभेचा कार्यकाळ दोन महिन्यात भंग होईल. त्याआधीतरी निर्णय़ लागावा, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत येत आहेत. उद्या ठाकरे सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघााडीतले सर्व प्रमुख नेते उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील आहेत. महाविकास आघाडीतल्या सर्व प्रमुख नेत्यांशी उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी होत असतात.
उद्धव ठाकरे आज दिल्लीत येणार आहेत. विधानसभा निवडणुका आपल्याला कशा जिंकता येतील, आणि जागावाटपात कोणतेही मतभेद होऊ नयेत यासाठी महाविकास आघाडीतले प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांच्या गाठीभेटी घेणार आहेत. आम्ही प्राथमिक चर्चा आणि बैठका सुरू केल्या आहेत. मुंबईत उ्द्या बैठक आहेत त्यात दोन प्रमुख नेते उभे राहतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
मनसेने संभाजीनगर आणि मुंबईत संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आहे. असे विचारले असता, संजय राऊत म्हणाले, ‘मनसेने त्यांचा उमेदवार कुठून उभा करावा हा त्यांच्या निर्णय आहे. लोकशाहीत त्यांना अधिकार आहे, आणि ही लोकशाही आम्ही मानतो. आधी महाराष्ट्रद्रोही मोदींना त्यांचा पाठिंबा होता. आता कुणला आहे बघुयात, असा चिमटाही त्यांनी काढला.
बांगलादेशच्या हिंसाचारावर बोलताना संजय राऊत म्हणाले, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी लोकशाहीचा मुखवटा लावून राजकारण केले. लोकशाहीच्या नावाखाली त्यांनी हुकूमशाही केली. फक्त आश्वासने देत राहिल्या, हे भारतातल्या राजकारण्यांनी त्याचे चिंतन केले पाहिजे.