Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Vs Sanjay Shirsat: हातात सिगारेट बेफिकीर वागणूक, शिरसाटांच्या Viral Video ने एकच खळबळ, भरलेली बॅग पैशांची की…

Sanjay Shirsat: संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. संजय शिरसाट एका बेडवर बसून फोनवर बोलताना दिसत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2025 | 03:36 PM
Sanjay Raut Vs Sanjay Shirsat: हातात सिगारेट बेफिकीर वागणूक, शिरसाटांच्या Viral Video ने एकच खळबळ, भरलेली बॅग पैशांची की…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्स विभागाने नोटीस धाडली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पैशांची बॅग घेऊन बसल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपांमुळे आता राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. कारण संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. संजय शिरसाट एका बेडवर बसून फोनवर बोलताना दिसत आहेत. त्यातच त्यांच्या शेजारी पैशांची भरलेली एक बॅग दिसून येत आहे. मात्र आता या व्हिडिओवर आणि संजय राऊत यांच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

माध्यमांमध्ये समोर आलेल्या व्हिडिओवर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, ‘मी आत्ताच हा व्हिडीओ पहिला. मात्र ते हॉटेल नाही तर, ते माझे घर आहे. मी घरात बसलो आहे. माझ्या घराची ती बेडरूम आहे. या व्हिडिओबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. माझ्या शेजारी माझा लाडका कुत्रा बसला आहे. मला टार्गेट करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे. एवढी मोठी बॅग पैशांची असेल तर घरातली कपाटे मेली आहेत का? त्यात पैसे नाही तर कपडे असलेली बॅग आहे.

Sanjay Shirsat Viral Video : संजय शिरसाटांचा पैशांच्या बॅगा घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल#SanjayShirsat #ViralVideo #PoliticalNews #MarathiNews pic.twitter.com/veikorIhjI

— Navarashtra (@navarashtra) July 11, 2025

मुर्खासारखे स्टेटमेंट करणे हे संजय राऊतलाच जमू शकते. सकाळ, दुपार आणि रात्री संजय राऊतांना एकनाथ शिंदेंचं दिसत आहेत. त्यांची गेलेली सत्ता आजही त्यांना स्वस्थ बसून देत नाही. संजय राऊतसारखा वेडा माणूस, त्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ कोणी काढला यावर माझा आक्षेप नाही.

संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती खुद्द शिरसाट यांनी दिली आहे. आयकर विभागाच्या नोटिशीमुळे राजकीय वतुर्ळात एकच चर्चा सुरु आहे.

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार? आयकर विभागाने बजावली नोटीस

मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या ‘विट्स हॉटेल’ची चर्चा सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये असताना, ते केवळ 67 कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतले, असा आरोप होत आहे. याप्रकरणाच्या चौकशीची मागणी विरोधकांकडून केली जात होती. असे असताना आता आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.

Web Title: Sanjay shirsat caught on camera viral video shows bag full of cash near bed amid sanjay rauts claims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • sanjay raut
  • Sanjay Shirsat
  • viral video

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: ‘पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली…; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊतांची जहरी टीका
1

Sanjay Raut News: ‘पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली…; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊतांची जहरी टीका

नको ते केलं अन् आयुष्याला नडलं! धरणावर स्टंट करताना व्यक्ती पाण्याच्या प्रवाहासह खाली कोसळला; थरारक दृश्ये अन् Video Viral
2

नको ते केलं अन् आयुष्याला नडलं! धरणावर स्टंट करताना व्यक्ती पाण्याच्या प्रवाहासह खाली कोसळला; थरारक दृश्ये अन् Video Viral

Bhujbal On Jarange Patil: “… तर मी गप्प कसा राहू?”; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर मोठे भाष्य
3

Bhujbal On Jarange Patil: “… तर मी गप्प कसा राहू?”; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर मोठे भाष्य

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार
4

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.