Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीसह वीज थकबाकी माफीचा लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतून सातारा जिल्ह्यातील ५३,७३६ शेतकऱ्यांना ५६९ कोटींची कर्जमाफी आणि २ लाख शेतकऱ्यांना १,०६८ कोटींची वीजबिल माफी मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 24, 2026 | 09:56 PM
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Photo Credit- X)

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
  • कर्जमाफीसह वीज थकबाकी माफीचा लाभ
  • भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची माहिती
सातारा : राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ५३ हजार ७३६ खातेदार शेतकऱ्यांना ५६९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या योजनेतील लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. याशिवाय ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपधारकांची वीज थकबाकी माफ करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना १,०६८ कोटी रुपयांचा अतिरिक्त दिलासा मिळणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भाजपचे गटनेते अविनाश कदम आणि विकास गोसावी उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यावेळी पूर्वीच्या कर्जमाफी योजनांतील काही अटी शिथिल करण्यात आल्या असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियमित कर्जफेडीची अट आणि ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची पूर्वीची मर्यादाही हटविण्यात आली आहे.

विठ्ठलाच्या साक्षीने कर्जमुक्तीचा श्रीगणेशा! पंढरीतून ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; ‘शब्द पाळला’ म्हणत मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ७.५ एचपीपर्यंतच्या कृषी वीजपंपांची सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीज थकबाकी माफ करण्याचा निर्णय जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला.

शेती क्षेत्र अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी सुमारे ९५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जात असून, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सौर कृषीवाहिनी, सौरपंप आणि नदीजोड प्रकल्प यांसारख्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. भविष्यात दिवसा शंभर टक्के वीजपुरवठा आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Satara News : ‘हरित साताऱ्यासाठी बिल्डर्स असोसिएशनने बळ द्यावे’; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे आवाहन, चारभिंतींलगत वृक्षारोपण अभियान

Web Title: Satara farmers get 569 crore loan waiver and 1068 crore electricity bill relief marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 09:56 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव
1

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
2

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
3

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
4

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.