Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कराड तालुका सकल मराठा समाजाने कराड-चिपळूण मार्गावर रास्ता रोको केला. ‘सगे-सोयरे’ निकष आणि कुणबी दाखल्यांच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले.

  • By विवेक
Updated On: Sep 03, 2026 | 08:38 PM
Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Follow Us
Follow Us:
  • वारुंजी फाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको
  • ‘सगे-सोयरे’ निकष लागू करण्याची मागणी
  • मागण्या मान्य न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा
 

कराड : मराठा आरक्षण, कुणबी दाखले आणि ‘सगे-सोयरे’ निकषाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी कराड तालुका सकल मराठा समाज आक्रमक झाला. वारुंजी फाटा (पाटण तिकाटणे) येथे सकाळी सुमारे ११ वाजता कराड-चिपळूण मार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

‘सगे-सोयरे’च्या मागणीवर आंदोलक आक्रमक

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने वारुंजी फाट्यावर एकत्र आले. हातात भगवे झेंडे घेतलेल्या आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘सगे-सोयरे निकष लागू झालाच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. शासनाने आता वेळकाढूपणा न करता ठोस निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीकडे गांभीर्याने पाहून त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

Maharashtra Band: मराठा आरक्षणामुळे राजकारण तापणार; उद्या ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद!

दरम्यान, आंदोलकांच्या शिष्टमंडळाने कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय दराडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

‘निर्णय नाही तर महामार्ग रोखू’

सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. आगामी काळात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Maratha Reservation: जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव ठप्प; कळंब-लातूर मार्गावर रास्ता रोको, टायर जाळल्याने तणाव

रास्ता रोकोमुळे कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: Maratha reservation rasta roko karad chiplun road varunji phata sage soyre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Satara News

संबंधित बातम्या

Maratha Reservation: जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव ठप्प; कळंब-लातूर मार्गावर रास्ता रोको, टायर जाळल्याने तणाव
1

Maratha Reservation: जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव ठप्प; कळंब-लातूर मार्गावर रास्ता रोको, टायर जाळल्याने तणाव

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
2

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं
3

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू
4

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.