Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय निवासस्थानी ‘मटणावळ’ अन् ‘दारूचा पूर’; महावीर जयंतीदिनी जलसंपदा विभागाचा ‘नंगा नाच’, कृष्णा खोरे महामंडळ चर्चेत

साताऱ्यातील कृष्णानगर येथील अधीक्षक अभियंत्यांच्या शासकीय निवासस्थानी अहिंसा पुजारी महावीर जयंती दिनी संगीत नि रंगीत उघडपणे कार्यक्रम झाला. खऱ्या अर्थाने आखाडी साजरी झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 06, 2026 | 07:10 PM
शासकीय निवासस्थानी 'मटणावळ' अन् 'दारूचा पूर'

शासकीय निवासस्थानी 'मटणावळ' अन् 'दारूचा पूर'

Follow Us
Follow Us:

 

  • शासकीय निवासस्थानी ‘मटणावळ’ अन् ‘दारूचा पूर’
  • महावीर जयंतीदिनी जलसंपदा विभागाचा ‘नंगा नाच’
  • कृष्णा खोरे महामंडळ चर्चेत
सातारा दि ६ (प्रतिनिधी): कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्मितीने खऱ्या अर्थाने जलसिंचन गतीने झाले. साताऱ्यातील कृष्णानगर येथील अधीक्षक अभियंत्यांच्या शासकीय निवासस्थानी अहिंसा पुजारी महावीर जयंती दिनी संगीत नि रंगीत उघडपणे कार्यक्रम झाला. खऱ्या अर्थाने आखाडी साजरी झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे. मटणाचा आस्वाद घेणाऱ्यांनी मात्र याबाबत मौन पाळणे महत्त्वाचे मानले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमुळे खऱ्या अर्थाने साताऱ्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, पर्यटन मंत्री आणि ग्राम विकास मंत्री असे चार मंत्रिपद असणाऱ्या सातारा जिल्ह्यात प्रशासकीय कारभार गतिमान आहे. तो एवढा गतिमान आहे की, शासकीय निवासस्थानी अहिंसा पुजारी महावीर जयंती दिनी दारूचा महापूर व मटणाचा ढीग अशी आखाडी साजरी झाली.

शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेऊन अनेकांनी तृप्तीचे ढेकर दिले. जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री जयंत शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी अगदी मंडप व रोषणाई करून हा अद्वितीय सोहळा पार पडला. विशेष बाब म्हणजे गाव जेवण असल्यासारखे अनेक जण उपस्थित होते. अवकाळी पावसाने गारठलेल्यांना घोटभर उब देण्याचा प्रकार या ठिकाणी राजेरोसपणाने साजरा झाला झाला.

Wai News: वाईत गद्दारीचा निषेध! विराज शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा, पुतळ्याचे जोडे मारून दहन

मार्च एंडिंग च्या निमित्ताने एप्रिल फुल नंतर दोन तारखेला महावीर जयंती मुहूर्तावर किती जणांचे बळी गेले? हे सांगणे आता कठीण झाले आहे. होय मी रंगीत नि संगीत ऐकण्यासोबत जेवण घातले? असे सांगण्याचे धाडस आता कोण करणार? हा सुद्धा कळीचा मुद्दा बनला आहे.

जलसंपदा विभागाने अनेक योजना सातारा जिल्ह्यात राबवल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या शेतापर्यंत काही पाटबंधारे व धरणाचे पाणी पोहोचले नाही. ही वस्तुस्थिती आहे. असे असताना दारूचा पूर आणि मटणाचा ढीग नेमका कशासाठी ? आणि त्याचा दरवळणारा वास काहीच्या नाकापर्यंत का पोहोचला नाही? हा सुद्धा प्रश्न आहे.

सातारा जिल्ह्यात कृष्णा खोरे विकास महामंडळ खऱ्या अर्थाने १९९५ साली युतीच्या माध्यमातून स्थापन झाले. आता तर भाजपची एकतर्फी सत्ता असल्यामुळे हम करे सो कायदा असा आता वायदा देणारे सत्तेवर आले आहेत. राज्यात शिंदे शाही व साताऱ्यातही शिदेशाही आणि पाटबंधारे विभागातच ही शिंदेशाही अवतरली आहे. आध्यात्मिकेचे झुल पांघरुण नंगानाच सुरू आहे. पोट पूजा करण्यासाठी दुर्गा पूजेचे नाव सांगण्यात येत आहे. अनेक ठेकेदारांचे टक्केवारी या कामी धावून आली आहे. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधारी व विरोधी पक्षांनी याबाबत आवाज उठवला नाही तरी चालेल कारण, आता सत्ताधारी व विरोधक ही मध्यरेषा पुसट झाली आहे. तरी जनता मात्र या मटणावळी व टक्केवारीचा धूर फार काळ सहन करणार नाही. अशी माहिती काहीही दिली आहे.

Satara News: साताऱ्यात महिलाशक्तीचा जागर! शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबीर आणि ‘होम मिनिस्टर’ सोहळा उत्साहात

Web Title: Satara irrigation department controversial party government bungalow mahavir jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • political news
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
3

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
4

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.