Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यात ‘स्मार्ट मीटर’वरून ठिणगी! महावितरण कार्यालयावर उद्या शरद पवार गटाचा हल्लाबोल; ‘या’ नेत्याकडे आंदोलनाचे नेतृत्व

सातारा जिल्ह्यात महावितरणच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक झाला आहे. शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कृष्णानगर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 09, 2026 | 04:03 PM
साताऱ्यात 'स्मार्ट मीटर'वरून ठिणगी! महावितरण कार्यालयावर उद्या शरद पवार गटाचा हल्लाबोल

साताऱ्यात 'स्मार्ट मीटर'वरून ठिणगी! महावितरण कार्यालयावर उद्या शरद पवार गटाचा हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात ‘स्मार्ट मीटर’वरून ठिणगी!
  • महावितरण कार्यालयावर उद्या शरद पवार गटाचा हल्लाबोल
  • शशिकांत शिंदे मैदानात
सातारा, दि. ९ (प्रतिनिधी): राज्यभर गाजत असलेल्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर आता सातारा जिल्ह्यातही राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महावितरण कंपनीकडून घरगुती तसेच उद्योग-व्यवसायिक ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. १०) दुपारी २ वाजता कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयावर आक्रमक आंदोलन छेडण्यात येणार आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील करणार असून, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.

महावितरणने सातारा जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला असला, तरी या धोरणामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांवर भविष्यात अतिरिक्त वीज बिलांचा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. स्मार्ट मीटर धोरण हे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हिताचे नसून खासगी कंपन्या आणि भांडवलदारांना लाभदायक ठरणारे असल्याचा दावाही पक्षाने केला आहे.

Satara News: साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; आत्मदहन व गळफासाच्या इशाऱ्याने खळबळ

स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ मागे घेण्यात यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दिला आहे. सातारा जिल्ह्यात स्मार्ट मीटरविरोधातील लढ्याचे रणशिंग फुंकण्यात आले असून, ही केवळ सुरुवात असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर घाटगे यांनी युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनीही स्मार्ट मीटर सक्तीविरोधात एकजूट दाखवत आंदोलनात सहभागी व्हावे आणि आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील विविध भागांत स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात असून, महावितरण कार्यालयासमोर उद्या मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

Web Title: Ncp sharad pawar faction protest against mahavitaran smart meter in satara marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • NCP Sharad Pawar
  • Protest
  • Satara
  • Satara News
  • smart meter

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: सातारा शहरावर पाणीसंकट! सांबरवाडीत भूस्खलनामुळे ‘कास’ योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली
1

Satara Water Crisis: सातारा शहरावर पाणीसंकट! सांबरवाडीत भूस्खलनामुळे ‘कास’ योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली

‘संजय राऊत हे तर शरद पवारांचेच शिष्य’, एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर गृहराज्यमंत्र्यांचा घणाघात; ‘पवार NDA मध्ये आले तर…
2

‘संजय राऊत हे तर शरद पवारांचेच शिष्य’, एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर गृहराज्यमंत्र्यांचा घणाघात; ‘पवार NDA मध्ये आले तर…

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल
3

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

Satara News: साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; आत्मदहन व गळफासाच्या इशाऱ्याने खळबळ
4

Satara News: साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; आत्मदहन व गळफासाच्या इशाऱ्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.