Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांचा एल्गार! न्याय हक्कांसाठी साताऱ्यात हजारोंचा मोर्चा, शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, शाळा बंद ठेवून आंदोलन

राज्याच्या शिक्षण धोरणाविरोधात सातारा जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी शाळा बंद ठेवून भव्य मोर्चा काढला. TET सक्ती रद्द करणे, जुनी पेन्शन लागू करणे आणि अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Jul 09, 2026 | 06:02 PM
शिक्षकांचा एल्गार! न्याय हक्कांसाठी साताऱ्यात हजारोंचा मोर्चा, शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, शाळा बंद ठेवून आंदोलन

शिक्षकांचा एल्गार! न्याय हक्कांसाठी साताऱ्यात हजारोंचा मोर्चा, शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, शाळा बंद ठेवून आंदोलन

Follow Us
Follow Us:

सातारा : राज्य व केंद्र शासनाच्या शिक्षण धोरणाविरोधात संतप्त झालेल्या सातारा जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी गुरुवारी शाळा बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. “शिक्षकांना शिक्षक म्हणूनच काम करू द्या”, “टीईटीची सक्ती रद्द करा”, “अशैक्षणिक कामांचा बोजा हटवा”, “जुनी पेन्शन लागू करा” अशा आक्रमक घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.

प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना, शाळा व्यवस्थापन समित्यांचे सदस्य, जागरूक पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. शासनाच्या शिक्षणविषयक धोरणांमुळे शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मोर्चेकऱ्यांनी टीईटीची सक्ती तातडीने रद्द करण्याची मागणी करत, आजपर्यंत स्पर्धा परीक्षा आणि नियमानुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांवर पुन्हा पात्रतेची अट लादणे हा विश्वासघात असल्याचे म्हटले. तसेच एसआयआर, बीएलओसह विविध अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षकांना अडकविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला.

Satara Water Crisis: सातारा शहरावर पाणीसंकट! सांबरवाडीत भूस्खलनामुळे ‘कास’ योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली

बीएलओसारखी कामे शिक्षकांकडून काढून ती सुशिक्षित बेरोजगार युवकांना द्यावीत, सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करावी, पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण असण्याची अट रद्द करून सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, संचमान्यतेचे अन्यायकारक धोरण मागे घ्यावे आणि शिक्षकांना कायमस्वरूपी अशैक्षणिक कामांतून मुक्त करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या.

“शिक्षकांचा सातत्याने होत असलेला अपमान आणि वाढता प्रशासकीय हस्तक्षेप आता सहन केला जाणार नाही. शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, विश्वंभर रणनवरे, महेंद्र जानुगडे, गणेश जाधव, दीपक भुजबळ, किरण यादव, राजेश शिंगाडे, उदय भंडारे, शरद यादव, सुलभा सस्ते, सुनिता देवकर, जयश्री कदम, मच्छिंद्र ढमाळ, रितेश गायकवाड, नवनाथ जाधव, विशाल कणसे, विजय शिर्के, समीर बागवान यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे हजारो शिक्षक सहभागी झाले.

शासनाने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास हा संघर्ष आणखी तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

साताऱ्यात ‘स्मार्ट मीटर’वरून ठिणगी! महावितरण कार्यालयावर उद्या शरद पवार गटाचा हल्लाबोल; ‘या’ नेत्याकडे आंदोलनाचे नेतृत्व

Web Title: Satara teachers protest tet old pension morcha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • TET Exam
  • TET Protest

संबंधित बातम्या

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील
1

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
2

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी! कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती
3

सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी! कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी
4

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.