Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jawali Landslide News: जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर, मोठी जीवितहानी टळली

साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सायघर येथे मुसळधार पावसामुळे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. प्रशासनाने तातडीने पावले उचलत धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर केले असून मोठी जीवितहानी टळली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 08, 2026 | 02:35 PM
जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर

जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर

Follow Us
Follow Us:
  • जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड!
  • धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर
  • मोठी जीवितहानी टळली
मेढा: जावळी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मौजे सायघर येथे आज भीषण प्रकार घडला. गावातील श्री शंकर दगडू धनावडे यांच्या घरावर दरड कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हालचाली करत धनावडे कुटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी तत्काळ सायघर गाठून परिस्थितीची पाहणी केली.

गेली दोन दिवसांपासून जावळी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून आज बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सायकर येते धनावडे यांच्या घरावर ही दरड कोसळली व त्यांचे घरगुती साहित्याचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवित हानी कोणतीही झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

पुणेकरांवर भीषण संकट! Khadakwasla धरणातून मुठा नदीत तब्बल ‘इतक्या’ हजार…; पावसाचा जोर कायम

दरम्यान घटबेची माहिती मिळताच म्हसवे गटाचे जिल्हा परिषद सदस्य मानकुमरे यांनी तहसीलदार प्रवीण मुद्गुल, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील तसेच ग्रामसेवक मंगेश शिंदे यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. व या कुटूंबियासह सायघर ग्रामस्थांना योग्य ते सहकार्य केले तसेच परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी संबधीत कुटूंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मानकुमरे यांनी प्रशासनाला दिले. तसेच भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर पहिल्याच पावसात जलमय; भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक बंद

Web Title: Satara jawali sayghar landslide house damaged heavy rain medha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Landslide News
  • Maharashtra Rain
  • rain
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
1

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
2

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
3

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!
4

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.