Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सातारा नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा; मालमत्ता कर, रस्ते दुरुस्तीसह तब्बल ४० महत्त्वाच्या विषयांवर होणार निर्णय

सातारा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा २३ जुलै रोजी होणार असून ४० विषयांचा अजेंडा ठेवण्यात आला आहे. मालमत्ता कर, रस्ते दुरुस्तीसाठी ३.५ कोटी अन् पाणीपुरवठ्यावर महत्त्वाचे निर्णय होणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 22, 2026 | 04:57 PM
सातारा नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा (Photo Credit- X)

सातारा नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • सातारा नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा
  • मालमत्ता कर, रस्ते दुरुस्तीसह तब्बल ४० महत्त्वाच्या विषयांवर होणार निर्णय
  • वाचा सविस्तर बातमी!
सातारा, दि. २२ (प्रतिनिधी): सातारा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. २३ जुलै रोजी छत्रपती शिवाजी सभागृहात होणार असून तब्बल ४० विषयांचा अजेंडा सभेपुढे ठेवण्यात आला आहे. शहरातील पायाभूत सुविधा, करआकारणी, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था आणि विविध विकासकामांबाबत महत्त्वाचे निर्णय या बैठकीत अपेक्षित असल्याने नागरिकांसह राजकीय वर्तुळाचेही या सभेकडे लक्ष लागले आहे.

सभेतील प्रमुख विषयांमध्ये सन २०२७-२८ ते २०३०-३१ या कालावधीसाठीच्या चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणीचा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. यासोबतच नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक उच्चदाब (एचटी) वीज जोडणी, शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, डेकोरेटिव्ह पोल आणि हायमास्ट उभारणी, तसेच मोती तलाव परिसराच्या विद्युतीकरणासंदर्भातील प्रस्तावांवरही चर्चा होणार आहे.

बीपीसीएलच्या गॅस पाइपलाइन प्रकल्पासाठी विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या रस्ते खोदाईनंतर दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव सभेपुढे येणार आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेसह कामाची जबाबदारी, खर्च आणि नागरिकांच्या तक्रारी या मुद्द्यांवर नगरसेवकांकडून सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सातारा एमआयडीसीच्या विकासाला वेग; उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली उच्चस्तरीय बैठक

याशिवाय विस्तारित पाणीपुरवठा योजना, सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्राचे आधुनिकीकरण, सोनगाव घनकचरा प्रकल्प, कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रसामग्री खरेदी, आधुनिक मत्स्यबाजार, दिव्यांगांसाठी स्वतंत्र झोन, वारसा हक्कातील सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, सुरक्षा रक्षक व करारावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवामुदतवाढीचे प्रस्तावही सभेत विचाराधीन असणार आहेत.
नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना गती, आर्थिक नियोजन आणि नागरिकांशी संबंधित निर्णय यावर सभेत सखोल चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सभेतील निर्णयांवर राहणार सर्वांचे लक्ष

पालिकेतील विविध विकासकामे, महसूल वाढीचे प्रस्ताव, शहरातील पायाभूत सुविधांची उभारणी आणि प्रलंबित योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात होणारे निर्णय आगामी काळातील शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यामुळे या सर्वसाधारण सभेत प्रशासन आणि नगरसेवक कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन

Web Title: Satara municipal council general meeting 40 proposals on agenda property tax road repair marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Property Tax
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
1

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
2

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
3

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
4

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.