Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: स्वच्छ भारत अभियानातून साताऱ्याला ‘हायड्रो जेटिंग’ मशीन प्राप्त; गटारे व सांडपाणी वाहिन्यांची आता यांत्रिक स्वच्छता

स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत सातारा नगरपरिषदेला अत्याधुनिक हायड्रो जेटिंग मशीन मिळाले आहे. यामुळे साताऱ्यातील भूमिगत गटारांची स्वच्छता आता आधुनिक पद्धतीने होणार असून कर्मचाऱ्यांना मॅनहोलमध्ये उतरण्याची गरज भासणार नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 17, 2026 | 08:30 PM
स्वच्छ भारत अभियानातून साताऱ्याला 'हायड्रो जेटिंग' मशीन प्राप्त; गटारे व सांडपाणी वाहिन्यांची आता यांत्रिक स्वच्छता

स्वच्छ भारत अभियानातून साताऱ्याला 'हायड्रो जेटिंग' मशीन प्राप्त; गटारे व सांडपाणी वाहिन्यांची आता यांत्रिक स्वच्छता

Follow Us
Follow Us:
  • स्वच्छ भारत अभियानातून साताऱ्याला ‘हायड्रो जेटिंग’ मशीन प्राप्त
  • गटारे व सांडपाणी वाहिन्यांची आता यांत्रिक स्वच्छता
  • मॅनहोलमध्ये उतरण्याची गरज नाही!
सातारा, दि. १७ जुलै: भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत सातारा नगरपरिषदेला अत्याधुनिक हायड्रो जेटिंग मशीन प्राप्त झाले असून, शहरातील भूमिगत गटारे व सांडपाणी वाहिन्यांच्या यांत्रिक स्वच्छतेसाठी हे मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित व परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.

स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, देशातील शहरे कचरामुक्त (Garbage Free Cities) करण्याबरोबरच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन सुधारणे, स्वच्छता व्यवस्थेचे यांत्रिकीकरण करणे, सफाई कर्मचान्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि शाश्वत नागरी स्वच्छता व्यवस्था निर्माण करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देत नागरी स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जात आहे.

सातारा नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या हायड्रो जेटिंग मशीनद्वारे उच्च दाबाच्या पाण्याच्या सहाय्याने भूमिगत गटारे, सांडपाणी वाहिन्या, मॅनहोल व चेंबर्समधील गाळ, कचरा व अडथळे प्रभावीपणे दूर करता येणार आहेत. त्यामुळे गटारे तुंबण्याचे प्रमाण कमी होऊन पावसाळ्यातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.

या मशीनमुळे गटार सफाईसाठी सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष गटारात उतरून काम करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, त्यांच्या सुरक्षिततेसह आरोग्याचे संरक्षण होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून स्वच्छता व्यवस्थेला अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Satara News : स्थायी समितीत गदारोळ; वादानंतर खासदार समर्थक नगरसेवकांचा वॉकआऊट, तासभर कामकाज ठप्प

याबाबत बोलताना सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. अमोल मोहिते म्हणाले, ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत प्राप्त झालेले हायड्रो जेटिंग मशीन सातारा शहराच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याबरोबरच सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी सातारा घडविण्यासाठी सातारा नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील राहील.”

सातारा नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० ची प्रभावी अंमलबजावणी करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना गुणवत्तापूर्ण नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून, “स्वच्छ सातारा – सुंदर सातारा – निरोगी सातारा” हे ध्येय साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. याप्रसंगी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष श्री अमोल मोहिते,उपनगराध्यक्ष ऍड श्री डी जी बनकर, आरोग्य सभापती श्री धनंजय जांभळे, नियोजन सभापती श्री अशोक शेडगे, बांधकाम सभापती श्री विनोद खंदारे, नगरसेवक श्री फिरोज पठाण, रविंद्र ढोणे, रविराज किर्दत, सुधाकर यादव, आरोग्य विभाग प्रमुख श्री राकेश गलियन, नितीन माळवे, सुजित जाधव उपस्थित होते.

खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद, पुसेगाव पोलिसांची धडक कारवाई; सात जण अटकेत, २१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Web Title: Satara municipal council gets advanced hydro jetting machine under swachh bharat mission marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
1

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
2

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन
3

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक
4

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.