Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara: साताऱ्यात महावितरण कार्यालयावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल! स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील आक्रमक

राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणाविरोधात साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक झाला आहे. आमदार शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर तीव्र निदर्शने करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 10, 2026 | 05:03 PM
साताऱ्यात महावितरण कार्यालयावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल!

साताऱ्यात महावितरण कार्यालयावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल!

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात महावितरण कार्यालयावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल!
  • स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील आक्रमक
  • वाचा सविस्तर बातमी!
सातारा दि १० (प्रतिनिधी): स्मार्ट मीटर बसविण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने शुक्रवारी साताऱ्यात आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या कार्यालयावर जोरदार निदर्शने केली. आमदार शशिकांत शिंदे आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सरकार आणि महावितरणविरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

कृष्णा नगरीतील ‘वीज मित्र’ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी “स्मार्ट मीटर म्हणजे जनतेची फसवणूक”, “सक्ती चालणार नाही”, “स्मार्ट मीटर रद्द करा” अशा घोषणा देत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. आंदोलनादरम्यान हातात निषेधाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी नागरिकांवर स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. स्मार्ट मीटर वापराबाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असून अनेक ठिकाणी सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ही परिस्थिती तातडीने थांबवून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तत्काळ रद्द करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

शिक्षकांचा एल्गार! न्याय हक्कांसाठी साताऱ्यात हजारोंचा मोर्चा, शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, शाळा बंद ठेवून आंदोलन

आमदार शशिकांत शिंदे यांनी, “स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक बोजा टाकण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. जनतेच्या हिताविरोधातील कोणताही निर्णय राष्ट्रवादी सहन करणार नाही. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा दिला.

माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनीही शासनावर टीका करत, “स्मार्ट मीटरची सक्ती करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. नागरिकांच्या हिताचा विचार न करता घेतलेले निर्णय आम्ही हाणून पाडू. लोकांच्या पैशावर अन्याय करणारे कोणतेही धोरण स्वीकारले जाणार नाही,” असे स्पष्ट केले.

आंदोलनामुळे काही काळ महावितरण कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, नागरिकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती सुरूच राहिली तर यापेक्षा अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल.

Satara News: साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; आत्मदहन व गळफासाच्या इशाऱ्याने खळबळ

Web Title: Ncp sharad pawar faction protest against smart meter in satara shashikant shinde warns mahavitaran marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • National Congress Party
  • Nationalist Congress Party
  • NCP Sharad Pawar
  • Protest
  • Satara

संबंधित बातम्या

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
1

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
2

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Sharad Ratna Awards : कलाकारांसाठी मोठी बातमी! मुंबईत रंगणार ‘शरद रत्न पुरस्कार’ सोहळा, पुणे बैठकीत रूपरेषा निश्चित..
3

Sharad Ratna Awards : कलाकारांसाठी मोठी बातमी! मुंबईत रंगणार ‘शरद रत्न पुरस्कार’ सोहळा, पुणे बैठकीत रूपरेषा निश्चित..

Vasai : खड्ड्यांविरोधातील उपोषणाचा आठवा दिवस; विवेक यांची प्रकृती ढासळली, आंदोलन स्थगित
4

Vasai : खड्ड्यांविरोधातील उपोषणाचा आठवा दिवस; विवेक यांची प्रकृती ढासळली, आंदोलन स्थगित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.