Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : शहरातील रस्ते ठरतायेत मृत्यूचा सापळा ; प्रशासनाच्याा भोंगळ कारभारावर नागरिकांचा उसळला संताप

वाई म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते निसर्गरम्य तलाव पण अशातच वाईत आता रस्त्यांची दुरावस्था झाली असून हे रस्ते मृत्यूचा सापळा होत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2026 | 05:24 PM
Satara News : शहरातील रस्ते ठरतायेत मृत्यूचा सापळा ; प्रशासनाच्याा भोंगळ कारभारावर नागरिकांचा उसळला संताप
Follow Us
Follow Us:
  • शहरातील रस्ते ठरतायेत मृत्यूचा सापळा
  • प्रशासनाच्याा भोंगळ कारभारावर नागरिकांचा उसळला संताप
वाई : वाई म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते निसर्गरम्य तलाव पण अशातच वाईत आता रस्त्यांची दुरावस्था झाली असून हे रस्ते मृत्यूचा सापळा होत आहेत. बावधन नाका ते मिशन हॉस्पिटल रिक्षा स्टॅन्ड दरम्यानचा रस्ता सध्या अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरला असून, उडणारी प्रचंड धूळ, खड्डे आणि निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची जोरदार मागणी केली आहे. चाळण झालेल्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराने बारिक खडी आणि कच टाकून केवळ दिखाऊ काम केल्याचा आरोप होत आहे. योग्य तांत्रिक पद्धतीने काम न केल्यामुळे रस्त्यावरून वाहन गेल्यानंतर धुळीचे प्रचंड लोट उडत आहेत. यामुळे वाहतूक धोकादायक बनली असून, नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहेत. एवढा त्रास होत असून देखील स्थानिक प्रशासन मात्र मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांचा संताप उसळला आहे.

Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर; गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?

धुळीचा मारा झाल्यामुळे श्वसनाचे गंभीर त्रास
रिक्षाचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेतली असता, संबंधित रस्ता एमएसआरडीसीच्या अखत्यारीत येतो, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रकार घडला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याऱ्यांशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी संपर्क साधला असता केवळ चार-पाच कर्मचारी पाठवून दिखावा करण्यात आला. फोटो काढले आणि अवघ्या काही मिनिटांत झाडू मारल्याचा आव आणत घटनास्थळ सोडले. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी अक्षरश: केराच्या टोपलीत फेकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रिक्षाचालकांना दिवसभर धुळीचा मारा सहन करावा लागत असून, अनेकांना श्वसनाचे गंभीर त्रास सुरू झाले आहेत.

चार मंत्री आणि दोन खासदार असून काय कामाचे?
एकूणच, वाईतील हा रस्ता सध्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असून, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांना प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. सातारा जिल्ह्याला चार मंत्री दोन खासदार असून सुद्धा सातारा जिल्ह्याचा विकास साधला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे आपल्या पक्षाचे नेते व पद मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मंत्र्यांनी नागरिकांना होणाऱ्या वेदनांची थोडी तरी जाण ठेवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांव्यातून होत आहे.

Kolhapur News : इंधनखर्चात लाखोंची बचत ; इचलकरंजी पालिकेच्या ताफ्यात ‘ईव्ही’ येणार ?

Web Title: Satara news city roads are becoming death traps citizens are angry over the administrations mismanagement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.