Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नको; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बांधकाम विभागाला सूचना

सार्वजनिक बांधकाम विभाग हा राज्याच्या विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारा विभाग आहे. या विभागामार्फत विविध शासकीय कार्यालये, इमारती, रस्ते व पूल आदी विकासकामे केली जातात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 18, 2026 | 02:50 PM
Satara News : विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नको; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बांधकाम विभागाला सूचना
Follow Us
Follow Us:
  • विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नको
  • मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बांधकाम विभागाला सूचना
सातारा : सार्वजनिक बांधकाम विभाग हा राज्याच्या विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारा विभाग आहे. या विभागामार्फत विविध शासकीय कार्यालये, इमारती, रस्ते व पूल आदी विकासकामे केली जातात. या सर्व पायाभूत सुविधा असून या कामांची गुणवत्ता व दर्जा याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणाऱ्या विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड करू नये, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाची आढावा बैठक झाली.

या बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागावाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता (विद्युत) समिधा सुरवसे, अधीक्षकअभियंता एन. व्ही. भंडे, विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता दयानंद म्हात्रे, अधीक्षक अभियंता विभावरी वैद्य यांच्यासह विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या व पूर्ण झालल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Kolhapur News : ऐन उन्हाळ्याच धरण कोरडं ठाक ; 17 टक्के पाणीसाठ्याने पाणीप्रश्न आणि शेती धोक्यात

रुग्णालयीन इमारतींच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष
बैठकीदरम्यान अधिनस्त कार्यालये, कार्यक्षेत्र, रस्ते व पूल यांची सांख्यिकी तसेच पुलांच्या तपशीलवार माहितीचे सादरीकरण करण्यात आले. 2022 सालापासून आजपर्यंत पूर्ण झालेली कामे, नाबार्ड अंतर्गत पूर्ण झालेले प्रकल्प तसेच हायब्रीड अ‍ॅन्युइटी अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते व पूल प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. 2026 च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेऊन त्यांच्या अंमलबजावणीस गती देण्याच्या सूचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रगतीपथावरील इमारतीची कामे, जिल्ह्यातील शासकीय इमारती तसेच रुग्णालयीन इमारतींच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. बीड येथील जिल्हा रुग्णालय व २०० खाटांच्या महिला रुग्णालयाच्या इमारतीच्या गुणवत्तेबाबतही माहिती घेण्यात आली.

नवीन प्रस्ताव सादर करण्याचेही दिले निर्देश
जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती, प्रलंबित कामे तसेच पैठण व शिरूर परिसरातील प्रकल्पांबाबत तत्काळ कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्या, नवीन कामांबरोबरच जुन्या कामांची दुरुस्ती करून नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तसेच वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची नियमित निगा राखली जाते का याची माहिती घेऊन विश्रामगृह व शासकीय परिसरातील वृक्ष लागवडीची देखभाल सुनिश्चित करण्याचे आदेश मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना दिले. सर्व संबंधित अधिका-यांनी आपापली कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि जबाबदारीने पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Kolhapur News : धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; कोल्हापूरसह 10 जिल्ह्यांत उभारणार सर्वात मोठं ‘कोठार’

Web Title: Satara news no compromise on the quality of development works minister shivendrasinghraje bhosales instructions to the construction department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
1

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
2

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
3

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!
4

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.