
फोटो सौजन्य सोशल मीडिया
मस्कतमधील कतांब बीचच्या किनाऱ्याजवळील हे गुलाबी रंगाचे डॉल्फिन इतर गडद रंगाच्या डॉल्फिनसोबत पोहताना दिसले . समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन पुन्हा पाण्यात डुबकी मारतानाची दृश्ये काही पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली . या व्हिडीओमुळे या अनोख्या डॉल्फिनची चर्चा जगभर सुरु झाली आहे . मात्र हे डॉल्फिन नेमक्या कोणत्या प्रजातींचे आहेत , याची अद्याप अधिकृत खात्री झालेली नाही .
Climate Crisis : जग अपयशी ;संयुक्त राष्ट्रांचा गंभीर इशारा ,तापमानवाढ २.८ अंशापर्यंत जाण्याची भीती
सामान्यतः डॉल्फिनचा रंग राखाडी किंवा गडद असतो . मात्र काही विशिष्ठ प्रजातींमध्ये वयानुसार त्वचेचा रंग बदलून गुलाबी किंवा फिकट पांढरट होऊ शकतो . इंडो – पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिनमध्येही असा रंग दिसतो . त्वचेखाली रक्तवाहिन्या स्पष्ट दिसणे आणि रक्तभिसरणातील बदल यामुळे त्वचेला गुलाबी छटा मिळू शकते . काही प्रकरणांमध्ये रंगद्रव्यावरील बदल किंवा अल्बिनिझम सारखी स्थितीही कारणीभूत ठरू शकते . मात्र , ओमान मध्ये दिसलेल्या डॉल्फिनच्या रंगांमधील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही .
ओमानच्या समुद्रात डॉल्फिनच्या अनेक प्रजाती आढळतात . त्यामुळे केवळ गुलाबी रंगावरून या जीवाची प्रजाती निश्चित करणे शक्य नाही . काही तज्ज्ञांनी रिसो डॉल्फिन किंवा इंडो पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिन असण्याची शक्यता केली आहे . मात्र याबाबत वैज्ञानिक पुष्टी झालेली नाही . या अनोख्या दर्शनामुळे ओमानच्या समुद्रातील जैवविविधतेकडे पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले गेले आहे .
पण या पहिल्यांदाच घडलेल्या घटनेमुळे जगभरात मात्र वेगवेगळ्या चर्चेला आणि अफवांना पेव फुटला आहे . सगळे जण आपले आपले तर्क लावत यावर बसले आहेत . कारण बहुदा अशा पद्धतीची ही घटना पहिल्यांदाच घडली आहे किंवा माणसाच्या निदर्शनास आली . जात हा गुलाबी डॉल्फिन रात्री फिरून पुन्हा समुद्राच्या तळाशी गेला असता तर अजून पर्यंत तो आपल्याला दिसलाच नसता .