या सगळ्यामुळे होतंय काय तर स्थानिक पर्यटनाचा चालना तर मिळत आहेच पण रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मुनावळे येथील जल पर्यटन केंद्रामुळे स्थानिक युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला असून बाहेरील पर्यटकांसाठी कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, टेन्ट निवास आदी सुविधा निर्माण होत असून यामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत. यामुळे होतंय काय तर शहरातच रोजगाराचा संधी आहेत हे समीकरण खोडलं जात आहे. शहराचा ताण कमी होऊन गावातच मिळणाऱ्या रोजगाराने गावचं गावपण देखील टिकून आहे.
वेगाने धावणाऱ्या बाइक सारखी जेट स्की राइड
मोठ्ठ्या गोल फुग्यात पाण्यात गरगर फिरवणारी बंपर राइड
पाण्यात बोटीवर झोपून वेगाने पाण्यात भिजवणारी एस बपंर राइड..
केळाच्या आकाराची बोट असणारी बनाना राइड…
उडणाऱ्या माशाची अनुभुती देणारी फ्लाय फिश…
रिगल स्पीड बोट
पॅरासिलिंग
कायाकिंग
सायकलिंग यामुळे पर्यटनाचा चालना मिळत आहे. मुनावळे येथे सद्या पाण्याची पातळी समाधानकारक असून पर्यटकांची संख्या वाढत आहे. सुरक्षित व आनंददायी पर्यटनासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व खबरदारी घेत आहोत. असं मुनावळे जल पर्यटन केंद्राचे व्यवस्थापक गोविंद खवणेकर यांनी सांगितलं.






