Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Ghevda Farmers News: दिल्लीत मान पण पीक विम्यात नापास! कोरेगावचा प्रसिद्ध घेवडा संकटात; शेतकरी आक्रमक

Satara News: सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामात विशेषतः कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक घेवड्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, शासनाच्या पीक विमा योजनेतील चुकीच्या निकषांमुळे या मुख्य पिकाचा विम्यात समावेश करण्यात आलेला नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 27, 2026 | 02:57 PM
Satara News, Koregaon Ghevda, Crop Insurance Scheme

Satara News, Koregaon Ghevda, Crop Insurance Scheme

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीच्या बाजारात मागणी असलेला सातारा जिल्ह्यातील कोरेगावचा घेवडा पीक विम्यापासून वंचित.
  • शासनाच्या चुकीच्या निकषांमुळे रब्बीतील मुख्य पिकाला विम्याचे संरक्षण नाही.
  • एकरी २० ते २५ हजार रुपयांचा खर्च करूनही कडक उन्हामुळे पीक वाळण्याच्या मार्गावर.
Satara Farmers News: राजधानी दिल्लीच्या बाजारपेठेत मागणी असणारा कोरेगाव तालुक्यातील घेवडा शासनाच्या गलथान भूमिकेमुळे गेली अनेक वर्ष पीक विम्यापासून वंचित असल्याने या भागातील शेतकरी शासनाच्या कारभराबाबत उदासीन आहे.

सातारा जिल्ह्या्त रब्बी हंगामात सर्वाधिक शेतकरी घेवडा पीक घेतात विशेष करून जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक घेवडा उत्पादन घेतले जाते अस असतानाही घेवडा पीक विम्या बाबत असलेल्या चुकीच्या निकषामुळे वंचित आहे याचा सर्वाधिक मोठा फटका या शेतकऱ्यांना सहन करावा लागतं आहे.

Wardha News : एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर, जिल्हा रुग्णालयातील प्रकार; रेफर आऊटवर दिला जातोय भर

सध्या पावसाभावी घेवडा पीक अडचणीत सापडलं आहे एकरी 20तें 25हजार खर्च करून जोपसलेले हे पीक आता वाळू लागलं आहे. शासनाने या पिकाची पहाणी करून या पिकासाठी मदत करावी, अशी मागणी हे शेतकरी करू लागले आहेत. असं असलं तरी हे पीक पीकविम्यात नसल्याने याला नुकसान भरपाई कशी मिळणार हा प्रश्न आहे.

मुळात अलीकडच्या काही वर्षा पासून पावसाचा लहरी पणा या पिकासाठी त्रास दायक ठरत आहे. मध्यम पाऊस ढगाळ वाटावारणात येणार हे पीक आता कडक उन्हामुळे वाया जाऊ लागलं आहे. अजून काही रिवसात पाऊसाने उघडीप दिली तर हे पीक हातातून जाईल अशी परस्थिती आहे.

Dharashiv Politics: भाजप प्रवेशासाठी निघालेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा यू-टर्न; ठाण्यात शिंदेंच्या

2020पासून राज्य शासनाचा कृषी विभाग अपयशी

राज्य शासनाने घेवडा पीकविम्यात घ्यावा यासाठी राज्य शासन केंद्राकडे गेली सात वर्षा पासून पाठपुरावा करत आहे. मात्र केंद्रातून अद्याप हे पीक पीक विम्यात घेतलं नाही. आम्ही हळद, आलं, आणि घेवडा ही तिन्ही पीक पीक विम्यात घ्यावी, असा प्रस्ताव आम्ही दिला होता. यातील हळद पीक आता पीक विम्यात समाविष्ठ झाले आहे. लवकरच घेवडा आणि आलं ही पीकेदेखील पीकविम्यात सामील केली जातील. असं सातारा जिल्हा कृषी अधीक्षत भाग्यश्री फरांदे यांनी म्हटलं आहे.

मुळात केंद्राकडे घेवडा हे पीक भाजीपाला प्रकारात नोंद आहे ते बदलून कडधान्य प्रकारात ते घ्यावे लागेल. तरच ते पीक विम्यासाठी पात्र होईल.

कोरेगाव उत्तर भाग हा दुष्काळी भाग म्हणून परिचित आहे. या भागात सर्वात जास्त घेवडा पीक घेतलं जात. चालू वर्षी घेवडा पेरणी पासून या पिकला हवा तसा पाऊस पडला, मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असून घेवडा पीक शेंगा भरणी काळ सुरु आहे. मात्र ऊन आणि पाणी नसल्याने आता हे पीक हातातून जाईल अशी भीती आहे. शासनाने खास बाब म्हणून या पिकासाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी विकास मतकर यांनी केली आहे.

 

Web Title: Satara newssatara koregaon ghevda farmers deprived of crop insurance heavy losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Crop Insurance
  • Satara

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले
1

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले

Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन
2

Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
3

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई
4

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.