Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला निर्देश, ठोसेघर-कुसूंबी पर्यटन विकासाचाही आढावा

साताऱ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. बैठकीत पर्यटन विकासाच्या विविध कामांचाही आढावा घेण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Aug 17, 2026 | 05:19 PM
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला निर्देश

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला निर्देश

Follow Us
Follow Us:

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वेळे ढेण ता. जावली येथील प्रकल्पग्रस्तांचे जमीन व आर्थिक मोबदला आदी प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करा. आलवडी ता. सातारा येथील धोकादायक घरांचे पुनर्वसन भूस्खलन होणार नाही अशा ठिकाणी झाले पाहिजे, याबाबतही तातडीने शासकीय सोपस्कार पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न मार्गी लावणे तसेच ठोसेघर, कुसूंबी, कास, भांबवली या पर्यटन स्थळांचा विकास यासंदर्भात आढावा बैठक झाली. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य अजित साळुंखे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मनोहर गव्हाड, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सह्याद्री व्याघ्र राखीवचे उप संचालक किरण जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सातपुते, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्यासह विविध अधिकारी, वेळे ढेण, आलवडी, आंबळे आदी गावातील ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Satara News: वडिलांचा गणवेश अन् मुलांच्या चेहऱ्यावर अभिमान!; सातारा पोलिस मुख्यालयातील ‘तो’ क्षण ठरला प्रेरणादायी

बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेऊन त्यावर योग्य तोडगा तातडीने काढण्याच्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. याबाबतचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे सादर करा, शासनाकडून हे प्रस्ताव मंजूर करून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवू, असा शब्द ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत दिला. बैठकीत ठोसेघर निसर्ग पर्यटन विकास आराखडा, कुसूबी पर्यटन विकास आराखडा यासह कास धरण, भांबवली धबधबा येथे पर्यटनवाढीसाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षितता व सोयीसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांचा आढावा ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतला. ही कामे लवकर मार्गी लागण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

Web Title: Shivendrasinharaje satara project affected rehabilitation tourism development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
2

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
3

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
4

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.