Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: वडिलांचा गणवेश अन् मुलांच्या चेहऱ्यावर अभिमान!; सातारा पोलिस मुख्यालयातील ‘तो’ क्षण ठरला प्रेरणादायी

तिरंग्याला सलाम करताना मुलांच्या डोळ्यात दिसणारा अभिमान आणि वडिलांच्या कर्तव्यभावनेतून त्यांना मिळणारी प्रेरणा यांचा सुंदर मिलाफ या ध्वजारोहणात पाहायला मिळाला. त्यामुळे पोलिस मुख्यालयातील हा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित राहिला नाही

  • By anuradha sagar
Updated On: Aug 17, 2026 | 04:05 PM
Satara News:  वडिलांचा गणवेश अन् मुलांच्या चेहऱ्यावर अभिमान!; सातारा पोलिस मुख्यालयातील ‘तो’ क्षण ठरला प्रेरणादायी
Follow Us
Follow Us:
  • सातारा पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण.
  • निखील पिंगळे यांची मुले शर्वराज आणि निशीका पोलिसांच्या गणवेशात सोहळ्यास उपस्थित.
  • कर्तव्याची पायमल्ली न करता पुढच्या पिढीला राष्ट्रभक्तीचे धडे देणारा क्षण.
Satara News: सातारा पोलिस मुख्यालयात तिरंगा डौलाने फडकत होता… राष्ट्रगीताचे सूर वातावरण भारावून टाकत होते… अन् राष्ट्रध्वजासमोर शर्वराज, निशीका या आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन पोलिस अधीक्षक निखील पिंगळे ध्वजाला सलामी देत होते. वडिलांच्या गणवेशाकडे कौतुकाने पाहणारी मुलेही त्याच अभिमानाने पोलिसांच्या गणवेशात उभी होती. कर्तव्याची शपथ, राष्ट्रध्वजाविषयीचा सन्मान आणि पुढच्या पिढीला देशप्रेमाचा संस्कार देणारा हा क्षण उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी आपल्या दोन्ही मुलांसमवेत ध्वजारोहण केले. तिरंगा आकाशात डौलाने फडकताच मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला अभिमान आणि वडिलांच्या चेहऱ्यावर दिसणारी कर्तव्यपूर्तीची भावना या प्रसंगाला वेगळेच भावविश्व देत होती. पोलिस मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही लक्ष या दोन्ही चिमुकल्या ‘पोलिसां’कडे वेधले गेले. त्यांच्या गणवेशाचे उपस्थितांनी कौतुक केले.

देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या मुलांना सोबत घेऊन स्वातंत्र्यदिन साजरा करणे, हा केवळ कौटुंबिक आनंदाचा क्षण नव्हता. तर ‘देश सर्वप्रथम’ या भावनेचा पुढच्या पिढीला दिलेला संस्कार होता. एका बाजूला देशाच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेऊन कर्तव्य बजावणारे वडील आणि दुसऱ्या बाजूला त्याच गणवेशाची ओढ मनात घेऊन उभे असलेली त्यांची मुले… हा क्षण पाहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला.

Koyna Dam Affected Rehabilitation: कोयना धरणाच्या शिल्लक जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत करा; अखिल

तिरंग्याला सलाम करताना मुलांच्या डोळ्यात दिसणारा अभिमान आणि वडिलांच्या कर्तव्यभावनेतून त्यांना मिळणारी प्रेरणा यांचा सुंदर मिलाफ या ध्वजारोहणात पाहायला मिळाला. त्यामुळे पोलिस मुख्यालयातील हा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित राहिला नाही; तर एका वडिलांनी आपल्या मुलांच्या मनात पेरलेली देशप्रेमाची बीजे आणि उद्याच्या जबाबदार पिढीचे स्वप्न यांचा भावस्पर्शी सोहळा ठरला.

बाबांच्या स्वप्नातून साकारला गणवेश

स्वातंत्र्यदिन म्हटल की, प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या पोशाखाकडे विशेष लक्ष देतो. मात्र, पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी शर्वराज, निशीका या आपल्या दोन्ही मुलांसाठी घेतलेला गणवेश केवळ कपड्यांचा पोशाख नव्हता; त्यामागे एक वडिलांचे स्वप्न आणि भावी पिढीला दिलेला संस्कार होता.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत पंतप्रधान मोदींशी भेट, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

मुलांनी भविष्यात आपल्यापेक्षाही मोठे अधिकारी व्हावे, पोलिस दलाविषयी त्यांच्या मनात लहानपणापासूनच जिव्हाळा निर्माण व्हावा आणि या क्षेत्राची ओढ त्यांच्या मनात रुजावी, या भावनेतून निखील पिंगळे यांनी त्यांच्या गणवेशाकडे विशेष लक्ष दिले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या गणवेशाच्या धर्तीवर त्यांनी टेलरकडून मुलांचे गणवेश खास तयार करून घेतले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात हे दोन्ही चिमुकले गणवेशधारी सर्वांचे आकर्षण ठरले.

 

Web Title: Satara sp nikhil pingale celebrates independence day with family in police uniform

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara
  • Satara Police

संबंधित बातम्या

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
1

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
2

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन
3

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
4

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.