Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai Accidenet: वाई-बावधन ओढ्याजवळ भीषण अपघात भरधाव ट्रक दुकानात घुसला, एक ठार, एक जखमी

सातारा जिल्ह्यातील वाई-पाचवड मार्गावर बावधन येथे भीषण अपघात झाला आहे. एका मद्यधुंद ट्रकचालकाने नियंत्रण गमावून ट्रक थेट किराणा दुकानात घुसवल्याने ७२ वर्षीय बाळासाहेब पिसाळ यांचा मृत्यू झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 11, 2026 | 09:36 PM
वाई-बावधन ओढ्याजवळ भीषण अपघात भरधाव ट्रक दुकानात घुसला

वाई-बावधन ओढ्याजवळ भीषण अपघात भरधाव ट्रक दुकानात घुसला

Follow Us
Follow Us:
  • वाई हादरले!
  • मद्यधुंद ट्रकचालकाचा सुसाट ट्रक थेट किराणा दुकानात घुसला
  • ७२ वर्षीय वृद्धाचा चिरडून मृत्यू, १ गंभीर
वाई : वाई-पाचवड मार्गावरील बावधन ओढा येथील पुलाशेजारी गुरुवारी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविण्यात येणारा टाटा कंपनीचा एपी २९ टीसी ०९७२ क्रमांकाचा १६१३ ट्रक अचानक नियंत्रण सुटून विरुद्ध दिशेने जाऊन “किराणा अँड स्नॅक्स सेंटर” या दुकानात घुसल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात बाळासाहेब लक्ष्मण पिसाळ (वय ७२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बंडा मोहिते हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की दुकानासह परिसरातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

दुकानासमोर उभी असलेली एमएच ११ सीएफ ०७६७ क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी, जी विश्वजीत अशोक शिंदे यांच्या मालकीची असून अजित आत्माराम शिंदे (रा. बावधन, ता. वाई) यांच्या दुकानासमोर उभी होती, तीही या अपघातात गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक नितीन कांबळे (रा. व्याहळी) हा वाईहून पाचवडकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण गमावून बसला. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार चालकाने मद्यप्राशन केले असल्यानेच हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पीएसआय अमित सुर्वे, रुपेश जाधव (ट्रॅफिक हवालदार) तसेच गोरखनाथ दाभाडे विशाल येवले राम कोळी धीरज कुमार भोसले राहुल भोईर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी ११२ क्रमांकावर संपर्क साधण्यात आला; मात्र वेळेवर शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. अखेर पोलिसांनी मानवतेचे दर्शन घडवत जखमी चालकाला स्वतःच्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

एल निनो पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सिआरए तंत्रज्ञान वापर करावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे

त्यानंतर वरद आयसीयू हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून डॉ. शैलेंद्र धेंडे यांनी स्वतः ॲम्बुलन्स चालवून मृत व्यक्ती व जखमींना पुढील उपचार व शवविच्छेदनासाठी वाई येथे हलविण्यात आले. या भीषण अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून भरधाव आणि बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच आपत्कालीन सेवांची अपुरी उपलब्धता हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निष्काळजी वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करून कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वाई पाचवड रस्त्याला बावधन ग्रामपंचायतीने बावधन गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या त्या रस्त्याला गतिरोधक टाका म्हणून वारंवार मागणी केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केले आहे अनेक वेळा मोठमोठे अपघात घडले आहेत याशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात शेती असल्याकारणाने लोकांची ये जा रस्ता ओलांडणे रस्त्याच्या शेजारी वस्ती असल्याकारणाने रहदारी मोठ्या प्रमाणात असते तरी ताबडतोब या रस्त्याला गतिरोधक टाकावे व होणारे अपघात टाळावे अशी विनंती युवा नेते विजयसिंह शशिकांत पिसाळ यांनी केली आहे

वाईतील लघु कुंभमेळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कृष्णाघाट परिसर भक्तिमय

Web Title: Satara wai pachwad road accident drunk truck driver crashes into grocery shop at bawdhan one dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Accident
  • Accident News
  • Wai News

संबंधित बातम्या

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह
1

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
2

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी
3

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी

जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
4

जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.