Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Water Supply : मुसळधार पावसामुळे साताऱ्यात पाणीसंकट; जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

सातारा शहरातील सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी तडे गेल्याने शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मुसळधार पावसामुळे दुरुस्तीचे काम आव्हानात्मक ठरत असून पुण्यातील तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकाकडून युद्धपातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2026 | 05:00 PM
मुसळधार पावसामुळे साताऱ्यात पाणीसंकट; जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

मुसळधार पावसामुळे साताऱ्यात पाणीसंकट; जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

Follow Us
Follow Us:
  • भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;
  • साताऱ्याच्या पश्चिम भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत
  • जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
 

सातारा : सातारा शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी तडे गेले आहेत. या बिघाडामुळे पश्चिम भागातील अनेक परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होत असून नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सततच्या पावसामुळे डोंगर उतारावरील माती जलवाहिनीवर कोसळल्याने पाइपलाइनवर मोठा दाब निर्माण झाला. परिणामी जलवाहिनीला तडे जाऊन मोठ्या प्रमाणात पाणी गळू लागले. घटनेची माहिती मिळताच सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले.

दुरुस्तीचे काम अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. मुसळधार पाऊस, चिखल आणि जलवाहिनीतून होणारी सततची गळती यामुळे कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे विशेष तांत्रिक कौशल्याची आवश्यकता भासल्याने पुण्यातील आयात इंजिनिअरिंग कंपनीच्या पाच सदस्यीय तज्ज्ञ पथकाला साताऱ्यात पाचारण करण्यात आले आहे. हे पथक जलवाहिनीतील तडे वेल्डिंग करून पाइप पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे.

Satara Rain News: सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम! कोयना धरणात ३५.७१ टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

पालिकेचे अभियंता शहाजी वाठारे तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी दिवसभराची शासकीय कामे पूर्ण करून रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून दुरुस्तीवर लक्ष ठेवत आहेत. जलवाहिनी पूर्ववत होईपर्यंत संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
या बिघाडाचा परिणाम पावर हाऊस, खाण टाकी, कात्रेवाडा आणि गणेश टाकी या जलसाठ्यांवर झाला असून तेथे अपेक्षित प्रमाणात पाणी पोहोचत नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गुरुवारीही शहराच्या पश्चिम भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नगरपालिकेकडून गेल्या दोन दिवसांत १०२ टँकर फेऱ्या करण्यात आल्या आहेत. एक्सप्रेस लाईनवरूनही नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत असला तरी मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी पडत आहे.
मुख्याधिकारी विनोद जळक यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत, दुरुस्तीचे काम शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Satara News : केळघर येथील रामजीबुवापूलावरील वाहतुक पूर्ववत! बांधकाम विभागाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी

Web Title: Satara water supply hit by landslide main pipeline damaged heavy rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Satara
  • Water supply

संबंधित बातम्या

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
1

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी! कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती
2

सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी! कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती

अतिक्रमण हटवलं, पण वाहतुकीचा प्रश्न कायम! साताऱ्यात रिक्षा थांब्यांच्या पुनर्नियोजनाची मागणी
3

अतिक्रमण हटवलं, पण वाहतुकीचा प्रश्न कायम! साताऱ्यात रिक्षा थांब्यांच्या पुनर्नियोजनाची मागणी

Satara News: जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार
4

Satara News: जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.