सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा पार पडल्या. या कालावधीत कामकाजात विलंब करणे, परीक्षाविषयक तांत्रिक यंत्रणेवर आवश्यक नियंत्रण न ठेवणे, कामकाज दुय्यम पद्धतीने हाताळणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करता अनियमितता करणे आणि प्राप्त तक्रारींची विहित मुदतीत दखल न घेणे, अशा बाबी निदर्शनास आल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
चोपडे यांच्या कार्यपद्धतीबाबत विभागीय चौकशीही करण्यात आली होती. या चौकशीत कामकाज प्रलंबित ठेवणे आणि अनियमितता केल्याचे आढळून आले. तसेच शासकीय सेवक म्हणून अपेक्षित असलेली कर्तव्ये पार पाडण्यातही कसूर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू असतानाही मंत्र्यांच्या अतिमहत्त्वाच्या बैठकींना ते सातत्याने गैरहजर राहत होते.
जिल्हा परिषदेच्या अन्य बैठकींनाही त्यांची अनुपस्थिती राहिल्याचे शासनाने म्हटले आहे. वारंवार सूचना करूनही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी आदेश काढला आहे.
Pune Crime: आंतरधर्मीय विवाहाला विरोध;चेन्नईहून पुण्यात आलेल्या बापाने मुलगी-जावयाचे अपहरण केल्याचा






