Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खोल समुद्रात आता नेटवर्कची चिंता नाही! ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून मच्छिमारांना मिळाला सॅटेलाइट फोन’

Satellite Phone for Fishermen News: मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून महाराष्ट्रातील मच्छिमारांना BSNL चे सॅटेलाइट फोन मिळणार आहेत. यामुळे खोल समुद्रात नेटवर्क नसतानाही आपत्कालीन संपर्क साधता येईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 28, 2026 | 08:42 PM
Satellite Phone for Fishermen: खोल समुद्रात आता नेटवर्कची चिंता नाही! (Photo Credit- X)

Satellite Phone for Fishermen: खोल समुद्रात आता नेटवर्कची चिंता नाही! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • खोल समुद्रात आता नेटवर्कची चिंता नाही!
  • ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून मच्छिमारांना मिळाला सॅटेलाइट फोन’
  • वाचा संपूर्ण बातमी!
मुंबई: खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छिमारांना अत्याधुनिक सॅटेलाइट फोन उपलब्ध (Satellite Phone for Fishermen) करून देण्यात येत आहे. मत्स्यव्यवसाय विभाग आणि बीएसएनएल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून या योजनेचा आरंभ मंत्रालयात करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच मच्छिमारांना सॅटेलाइट फोनचे वितरण करण्यात आले. या फोनद्वारे इनकमिंग आणि आउटगोइंग अशा दोन्ही प्रकारच्या संपर्काची सुविधा उपलब्ध आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालय, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून मच्छिमारांना प्रातिनिधिक स्वरूपात सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. मच्छिमारांना समुद्रात आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, हवामान आणि सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त… pic.twitter.com/HjUWYJTMEp — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 28, 2026

काय म्हणाले नितेश राणे?

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, “राज्यातील मच्छिमारांचे प्राण आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. खोल समुद्रात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत सॅटेलाईट फोन सुविधा मच्छिमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था ठरेल. ‘बीएसएनएल’च्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असून, यामुळे समुद्रातील सुरक्षा, बचावकार्य आणि संप्रेषण अधिक प्रभावी होईल.” या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातही संपर्क साधणे शक्य होणार असून, खराब हवामान, यांत्रिक बिघाड, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर संकटांच्या वेळी तात्काळ मदत मागविणे सुलभ होणार असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

CJP Protest: सीजेपी आंदोलकांना मोठा दिलासा! मुंबईतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

सॅटेलाईट फोन सुविधेमुळे मत्स्य नौकांचा किनाऱ्याशी सातत्यपूर्ण संपर्क

सॅटेलाईट फोन सुविधेमुळे मत्स्य नौकांचा किनाऱ्याशी सातत्यपूर्ण संपर्क राहणार असल्याने शोध व बचाव मोहिमांना अधिक वेग मिळेल. हवामानातील बदल, समुद्री इशारे आणि सुरक्षा सूचना मच्छिमारांपर्यंत त्वरित पोहोचविणे शक्य होईल. परिणामी समुद्रातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आणि मच्छिमारांचे जीवित अधिक सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होणार आहे.

राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी मच्छिमारांना समुद्रात कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी अखंड संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तातडीने मदत मिळावी तसेच हवामान आणि सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला गती देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या ‘मच्छिमार सुरक्षा प्रथम’ या धोरणानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार असून, समुद्रातील संप्रेषण व्यवस्था अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि सुरक्षित होईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने राज्य शासनाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात धडाकेबाज निर्णय! अनुसूचित जातीपासून ते कृषी विभागापर्यंत… वाचा एका क्लिकवर

Web Title: Satellite phone for fishermen under mukhyamantri matsyasampada yojana marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • bsnl
  • CM Devendra Fadnavis
  • fishermen
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

 ‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
1

 ‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

Commonwealth Games 2026 मध्ये महाराष्ट्रच्या लेकाचा डंका; हाय जंपमध्ये सर्वेशने भारतासाठी जिंकले ‘रौप्य’ पदक
2

Commonwealth Games 2026 मध्ये महाराष्ट्रच्या लेकाचा डंका; हाय जंपमध्ये सर्वेशने भारतासाठी जिंकले ‘रौप्य’ पदक

BSNL Recharge Plan: कंपनीची नवीन फ्रीडम ऑफर! केवळ 150 रुपयांत मिळणार ओटीटी फायदे आणि बरंच काही…
3

BSNL Recharge Plan: कंपनीची नवीन फ्रीडम ऑफर! केवळ 150 रुपयांत मिळणार ओटीटी फायदे आणि बरंच काही…

कारगिल वीरांचे शौर्य भारताच्या इतिहासात अजरामर; शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ठाम – मुख्यमंत्री फडणवीस
4

कारगिल वीरांचे शौर्य भारताच्या इतिहासात अजरामर; शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ठाम – मुख्यमंत्री फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.