CJP Protest: सीजेपी आंदोलकांना मोठा दिलासा!
नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर फुटीविरोधात जंतर-मंतरवरून पेटलेली आंदोलनाची ठिणगी मुंबईपर्यंत पोहोचली होती. या आंदोलनात तरुणाईने सरकारसमोर ३ मुख्य मागण्या मांडल्या होत्या. यामध्ये शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची सर्वात प्रमुख आणि आक्रमक मागणी करण्यात आली होती. आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता आणि अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवले होते.
आंदोलनकर्त्यांच्या भावना आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप केला. आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, “आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक करिअरवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.”
Rohit Pawar PC: १२ लाखांत फुटला MPSC चा पेपर, ५ लाख ॲडव्हान्स; रोहित पवारांचा नवा बॉम्ब
दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, सरकारने खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी अद्याप त्याबाबत कोणताही आदेश जारी केलेला नाही. त्यांना मंगळवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आम्ही त्या आदेशाची वाट पाहत आहोत. त्यांनी अशी चिंता व्यक्त केली की, आंदोलन संपल्यानंतर सरकार पूर्वीप्रमाणेच व्यक्तींना वैयक्तिक पातळीवर लक्ष्य करून त्यांचा छळ करू शकते. असे होऊ नये यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, “सरकारसोबत झालेल्या आमच्या चर्चेदरम्यान, सर्व विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेण्यासाठी सरकार मंगळवारपर्यंत आदेश जारी करेल यावर आम्ही सहमत झालो होतो. परंतु जर सरकारने उद्यापर्यंत आदेश जारी केला नाही आणि खटले मागे घेतले नाहीत, तर कॉकरोच जनता पक्ष पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबेल. आम्ही आणखी एक आंदोलन करू.”






