girish mahajan
नाशिक – सत्यजीत तांबे यांनी मी पाठिंबा मागण्यासाठी भाजपकडेही जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या बंडाला भाजपची फूस असल्याचेही बोलले जात आहे. अशातच भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “सत्यजित तांबे सहज निवडून येतील पण भाजपचा पाठिंबा घेतला तर..” असं वक्तव्य महाजन यांनी केल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
सत्यजित तांबे गोल्ड मेडल घेतील, पास होतील पण भाजपने पाठींबा दिला तर. भाजप ज्याला पाठिंबा देईल तो डिस्टिंक्शनमध्ये पास होईल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. भाजपच्या बंडखोर उमेदवार शुभांगी पाटील यांच्याविषयी विचारले असता महाजन म्हणाले, की जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांचे माघारी आम्ही केल्या आहेत. बाकी सगळ्यांच्या माघारी घेत शोधत फिरण्याची गरज नाही. भरपूर लोक उभे राहतात त्यांना मतं किती पडतात त्याबद्दल बोलायचं नाही. राजकीय दृष्ट्या आम्हाला फायद्या तोट्याची लोक आहे. कोणाला उभे ठेवायचे कोणाला मागे घ्यायचं ते व्यवस्थित झालेले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? आमचा पाठिंबा कोणाला हे काही सांगता येत नाही. उद्या काय होईल? देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. त्रिशंकू सारखी परिस्थिती आहे. कोण कोणाकडे जाईल, कोण कोणाला पाठिंबा देईल? जोपर्यंत हे निश्चित होत नाही, तोपर्यंत कोण किती प्रभावी ठरेल हे सांगणं कठीण असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकरांना कोणी अधिकार दिला
– पुढे महाजन म्हणाले की त्यांना कोणी अधिकार दिला भाजपचा चेहरा ठरविण्याचा, आमच्याकडे अनेक चेहरे आहेत. प्रकाश आंबेडकरांना अधिकार दिलेला नाही. काय निर्णय घेयाचा पक्षश्रेष्ठी घेतील. आम्ही कुणाच्याही माघारीसाठी -शर्तीचे प्रयत्न केले नाहीत. जे आमचे लोक होते त्यांनी माघार घेतली जाधव, विसपुते यांनी माघार घेतली. सगळे रिंगणात आहे देवेंद्र फडणवीस आले की योग्य तो निर्णय होईल