Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SC On Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरच मार्गी लागणार; सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 15, 2025 | 12:46 PM
कार्यपालिका न्यायालय अन् न्यायाधीश बनू शकत नाही; 'बुलडोझर' कारवाईवर सरन्यायाधीशांचं परखड मत

कार्यपालिका न्यायालय अन् न्यायाधीश बनू शकत नाही; 'बुलडोझर' कारवाईवर सरन्यायाधीशांचं परखड मत

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  मागील दोन वर्षापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार आंदोलन केले. जालना येथील अंतरवली सराटी येथे जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करुन राज्यकर्त्याची झोप उडवली. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारले होते. यानंतर आता मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये असून याबाबत कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या द्विपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देताना नवीन खंडपीठाची निर्मिती करण्याचे सांगितले आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SCBC प्रवर्गातंर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या याचिकांवर तत्काळ नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या वर्षी जानेवारीमध्ये तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाल्यानंतर याचिकांवर सुनावणी झाली नाही. त्याविरोधात याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात पोहचले. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मराठा आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर जलद सुनावणी करण्यासाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश दिले. यामुळे लवकरच मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

जानेवारीमध्ये तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाल्यानंतर याचिकांवर सुनावणी झाली नाही. न्यायमूर्ती उपाध्याय हे पूर्ण किंवा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते जे गेल्या वर्षी एप्रिलपासून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) कायदा, २०२४ विरुद्धच्या याचिकांवर सुनावणी करत होते.

आगामी शैक्षणिक सत्रामुळे निर्माण झालेली निकड आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्णय घेण्यास होणारा विलंब होत असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालापुढे मांडला आहे. तसेच हा निर्णय न लागल्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी उशीर होण्याची शक्यता प्रकर्षाने आणि गांभीर्याने सांगण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाला योग्य ते निर्देश देण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर आता सुप्रीम कोर्टाने नवीन खंडपीठ तया करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

Web Title: Sc chief justice bhushan gavai directs to constitute a new bench to decide on maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • Bhushan Gawai
  • Maratha Reservation
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

केंद्र सरकारला राष्ट्रपती अन् राज्यपालांवर नको कोणते बंधन; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन वादंग
1

केंद्र सरकारला राष्ट्रपती अन् राज्यपालांवर नको कोणते बंधन; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन वादंग

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
2

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
3

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
4

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.