Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम घाटातील ड्रॅगनफ्लाय प्रजातींमध्ये ३५ टक्के घट; जैवविविधतेसाठी धोक्याची घंटा

पश्चिम घाटामध्ये एका सर्वेक्षणात ड्रॅगनफ्लाय (चतुर) आणि डॅमसेल्फ्लाय (टाचणी) या ओडोनाटा गटातील ज्ञात प्रजातींमध्ये तब्बल ३५ टक्के घट झाल्याचे आढळले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 26, 2026 | 04:35 PM
survey found 35 percent decline in known species of dragonflies and damselflies

survey found 35 percent decline in known species of dragonflies and damselflies

Follow Us
Follow Us:

Pune News : पुणे : सुनयना सोनवणे : पश्चिम घाटातील जैवविविधतेबाबत चिंताजनक वास्तव समोर आले आहे. एका सर्वेक्षणात ड्रॅगनफ्लाय (चतुर) आणि डॅमसेल्फ्लाय (टाचणी) या ओडोनाटा गटातील ज्ञात प्रजातींमध्ये तब्बल ३५ टक्के घट झाल्याचे आढळले आहे. पर्यावरणीय (Environment News) दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या कीटकांच्या विविधतेतील ही घट पश्चिम घाटातील गोड्या पाण्याच्या परिसंस्थेबाबत गंभीर परिणामांची सूचना देणारी ठरत आहे.

फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या पाच राज्यांतील १४४ ठिकाणी हे व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सुमारे १६०० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आणि जागतिक स्तरावर जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटातील गोड्या पाण्यातील जैवविविधतेचे हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे मूल्यांकन मानले जात आहे.

हे देखील वाचा : “भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी..; छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याने रोहित पवारांचा संताप अनावर

डॉ. पंकज कोपर्डे (सहाय्यक प्राध्यापक, एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे), अराजुश पायरा (पीएचडी स्कॉलर), अमेय देशपांडे (एमएससी विद्यार्थी) आणि रेजी चंद्रन (सोसायटी फॉर ओडोनेट स्टडीज, केरळ) यांच्या संशोधन पथकाने नद्या, ओढे, धबधबे, तलाव, सरोवरे आणि धरणे अशा विविध गोड्या पाण्यातील अधिवासांमध्ये शिस्तबद्ध क्षेत्रीय अभ्यास केला.

या संशोधनात ओडोनाटाच्या १४३ प्रजातींची नोंद करण्यात आली. त्यामध्ये पश्चिम घाटासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशा ४० प्रजातींचा समावेश आहे. मात्र, या प्रदेशात असलेल्या एकूण प्रजातींपैकी ही संख्या केवळ ६५ टक्के आहे. यामुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त होत आहे.

ओडोनाटा प्रजाती पर्यावरणातील बदलांबाबत अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना ‘इंडिकेटर टॅक्सा’ म्हणजेच पर्यावरणीय सूचक मानले जाते. त्यांचे पुनरुत्पादन पूर्णपणे गोड्या पाण्याच्या परिसंस्थेवर अवलंबून असल्याने त्यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती थेट जलस्रोतांच्या आरोग्याबाबत सूचक ठरते.

हे देखील वाचा : धीरेंद्र शास्त्री पुन्हा बरळला! छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याने पेटला वाद

संशोधनात एलाटोनेउरा सौटेरी, प्रोटोस्टिक्टा सँग्विनोस्टिग्मा आणि सायक्लोगॉम्फस यप्सिलॉन या तीन प्रजाती ‘असुरक्षित’ श्रेणीत असल्याचे आढळले. तसेच बहुतेक प्रजाती आययूसीएन रेड लिस्टमध्ये ‘माहितीचा अभाव’ किंवा ‘मूल्यांकन न झालेली’ या श्रेणीत असल्याने वैज्ञानिक माहितीची कमतरता स्पष्ट झाली.

राज्यानुसार प्रजातींची संख्या

  • महाराष्ट्र – १०० (१२ वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती)
  • केरळ – ८३ (३३ वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती)
  • कर्नाटक – ६४
  • गोवा – ३५
  • गुजरात – १८
एमआयटी-डब्ल्यूपीयू विद्यापाठीचे सहायक प्राध्यापक डॉ. पंकज कोपर्डे म्हणाले की, ‘हे पश्चिम घाटातील ओडोनाटाचे आजवरचे सर्वात व्यापक सर्वेक्षणांपैकी एक आहे. ज्ञात प्रजातींपैकी फक्त ६५ टक्के प्रजाती आढळणे ही गंभीर बाब असून, प्रजाती आणि त्यांच्या अधिवासाचा संभाव्य ऱ्हास याचे संकेत यातून मिळतात. पायाभूत सुविधा विकास, जलविद्युत प्रकल्प, प्रदूषण, जमिनीच्या वापरातील बदल, अनियंत्रित पर्यटन, वारंवार लागणारे वणवे आणि हवामान बदल यामुळे पश्चिम घाटातील परिसंस्थेवर वाढता ताण निर्माण होत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. तातडीने संवर्धनात्मक उपाययोजना न केल्यास केवळ प्रजाती नव्हे, तर संपूर्ण गोड्या पाण्याची परिसंस्था धोक्यात येऊ शकते.’ असे मत त्यांनी मांडले.

 

 

Web Title: Survey found 35 percent decline in known species of dragonflies and damselflies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Environment Department
  • pune news
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.