Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahavitaran : उन्हाच्या तडाख्यामुळे महावितरणचा मोठा निर्णय; वीज खंडित होण्यापासून दिलासा

राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देखभाल, दुरुस्तीची कामे आता दुपारी करण्याऐवजी सकाळी केली जाणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 26, 2026 | 04:45 PM
उन्हाच्या तडाख्यामुळे महावितरणचा मोठा निर्णय; वीज खंडित होण्यापासून दिलासा

उन्हाच्या तडाख्यामुळे महावितरणचा मोठा निर्णय; वीज खंडित होण्यापासून दिलासा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केली जाणारी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे आता दुपारी करण्याऐवजी सकाळी ७ ते ११ या वेळेतच पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या मुख्यालयाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. यामुळे उन्हाच्या तडाख्यात दुपारी वीज खंडित होण्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

पावसाळ्यात झाडांच्या फांद्या वीजतारांना लागून होणारे बिघाड, शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र, सध्या अनेक ठिकाणी ही कामे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होती. दुपारच्या कडक उन्हात वीज नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि घरून काम करणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल होत होते. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने कामाचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

दुरुस्तीसाठी ‘दुपार’ टाळणार

महावितरणने दिलेल्या नव्या सूचनांनुसार, ज्या दिवशी दुरुस्तीचे काम असेल, त्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व कामे आटोपून वीजपुरवठा पूर्ववत करणे बंधनकारक आहे. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस ही मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कामामुळे ज्या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे, त्याची पूर्वसूचना ग्राहकांना एसएमएस किंवा इतर माध्यमांतून देणेही अनिवार्य करण्यात आले आहे.

यंत्रणा सज्जतेसाठी विविध कामे

या मोहिमेअंतर्गत वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, गंजलेले वीजखांब आणि जुन्या तारा बदलणे, तुटलेले इन्सुलेटर दुरुस्त करणे, तसेच रोहित्रांचे (ट्रान्सफॉर्मर) ऑइल फिल्टरेशन आणि अर्थिंग तपासणे अशी महत्त्वाची कामे केली जात आहेत. याशिवाय, फिडर पिलरची स्वच्छता आणि नादुरुस्त ‘लाइटनिंग अरेस्टर’ बदलून पावसाळ्यातील वीजपुरवठ्याची पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला जात आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे दुरुस्तीची कामेही वेळेत पूर्ण होतील आणि नागरिकांना दुपारच्या उन्हात वीज कपातीचा सामना करावा लागणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरमहा मिळणार बोनस आणि रजेचे वेतन

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण), महापारेषण आणि महानिर्मितीमधील हजारो कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची माहिती आहे. या सर्व कंत्राटी कामगारांना पूर्वीप्रमाणेच बोनस आणि रजेचे वेतन दरमहा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, महावितरणच्या औद्योगिक संबंध विभागाने तसे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. नव्या निर्णयानुसार, नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीतील थकीत बोनस आणि रजेचे वेतन मे महिन्याच्या पगारात एकत्रितरीत्या दिले जाणार आहे. यामुळे कपात झालेली प्रलंबित रक्कम कंत्राटी कामगारांना परत मिळणार असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा लाभणार आहे. “प्रशासनाच्या या निर्णयामुळे कामगारांच्या हक्काचे पैसे त्यांना वेळेवर मिळणार आहेत,” असे कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष नीलेश खरात आणि प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले.

Web Title: Mahavitaran has taken a big decision due to the scorching heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • mahavitaran
  • Mahavitaran Department
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सुरू;  रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा
1

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाला प्रशासकीय ‘ब्रेक’; केंद्र सरकारचा थेट प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा
2

नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाला प्रशासकीय ‘ब्रेक’; केंद्र सरकारचा थेट प्रकल्प गुंडाळण्याचा इशारा

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा
3

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा

Sunetra Pawar : ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन
4

Sunetra Pawar : ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.