Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गंगापूर-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एकाचा मृत्यू तर…

गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आंबेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. यातील जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 03, 2025 | 09:24 AM
गंगापूर मार्गावर अपघात; एकाचा मृत्यू

गंगापूर मार्गावर अपघात; एकाचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

गंगापूर : गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आंबेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. यातील जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.

भागचंद दयाराम बैनाडे (वय ५५, रा. कोबापूर) यांचा मृत्यू झाला असून, सुरेश शांतीलाल चरांडे (वय ४०, रा. कोबापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. भागचंद बैनाडे व सुरेश चरांडे हे दोघे मोटारसायकल (क्र. एमएच २० बीडब्ल्यू ५३६५) वरून गंगापूरहून कोबापूरकडे जात होते. सायंकाळी सुमारे साडेसहाच्या सुमारास आंबेवाडी फाट्यानजीक गंगापूरकडे येणाऱ्या ट्रक (क्र. एमएच ०४ एचवाय ३५६१) ने मोटारसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.

दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, रोहित शिंदे, नंदू सातपुते तसेच सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक शिरसाट यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल धाबे यांनी तपासणी करून भागचंद बैनाडे यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी सुरेश चरांडे यांच्यावर डॉ. शेख नशित व मुन्ना भोसले यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविले.

ट्रकचालकाविरोधात पोलिसांत गुन्हा

या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या अपघातामुळे कोबापूर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यातही अपघाताची घटना

दुसरीकडे, पुणे शहरात सातत्याने जड वाहनांचे अपघात होत आहेत. भरधाव वेगातील सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वारासह दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी सिमेंट मिक्सरच्या चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फुरसूंगीतील मंतरवाडी चौकातील शेल पेट्रोल पंपाजवळ घटना घडली आहे.

Web Title: Serious accident on gangapur sambhajinagar highway one person died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • Accident News
  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

Gujarat Accident: गुजरातच्या ‘या’ धार्मिकस्थळी मोठी दुर्घटना; रोप-वे तुटल्याने 6 जण दगावले तर…
1

Gujarat Accident: गुजरातच्या ‘या’ धार्मिकस्थळी मोठी दुर्घटना; रोप-वे तुटल्याने 6 जण दगावले तर…

मालवाहू वाहन उलटून भीषण अपघात; सहा जण गंभीर जखमी, महिलांचाही समावेश
2

मालवाहू वाहन उलटून भीषण अपघात; सहा जण गंभीर जखमी, महिलांचाही समावेश

chhatrapati Sambhajinagar: महाराज असल्याचे सोंग करत चक्क केली गांजाची शेती,आरोपी अटकेत
3

chhatrapati Sambhajinagar: महाराज असल्याचे सोंग करत चक्क केली गांजाची शेती,आरोपी अटकेत

Chh. Sambhaji Nagar : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचा पक्ष सोडलेल्या लोकांना खैरेंचा टोला
4

Chh. Sambhaji Nagar : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचा पक्ष सोडलेल्या लोकांना खैरेंचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.