Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी, दोन्ही पाय अन् हात फ्रॅक्चर; अपघातानंतर चालक फरार

लोणीकंद भागातील तुळापूर-मरकळ रस्त्यावर भरधाव चारचाकी चालकाने पादचारी महिलेला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 27, 2026 | 12:30 AM
चारचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी, दोन्ही पाय अन् हात फ्रॅक्चर; अपघातानंतर चालक फरार

चारचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी, दोन्ही पाय अन् हात फ्रॅक्चर; अपघातानंतर चालक फरार

Follow Us
Follow Us:

पुणे : लोणीकंद भागातील तुळापूर-मरकळ रस्त्यावर भरधाव चारचाकी चालकाने पादचारी महिलेला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही पाय, खांदा आणि हाताची बोटे फ्रॅक्चर झाली आहेत. अपघातानंतर जखमी महिलेला मदत न करता चालक वाहनासह फरार झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

 

याप्रकरणी सोमेश पंकज कडूसकर (वय २८, व्यवसाय सिक्युरिटी गार्ड, सध्या रा. मरकळ, खेड, मूळ रा. सावेडी प्रेमदान हडको, अहिल्यानगर) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसांपुर्वी (दि. २३ मे) पहाटे साडेपाचच्या सुमारास तुळापूर-मरकळ रोडवरील श्रेयश वॉशिंग सेंटरजवळ जयवंतनगर परिसरात ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांची आई रस्त्याच्या कडेला पायी चालत जात होत्या. भरधाव वेगातील अज्ञात कार चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांना समोरून धडक दिली. या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर मार बसला असून दोन्ही पायांना गुडघ्याजवळ फ्रॅक्चर झाले आहे. तसेच डावा खांदा, हाताची बोटे आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातानंतर चालकाने जखमी महिलेला कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. तक्रारदार यांच्या आईवर उपचार झाल्यानंतर तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : छत्रपती संभाजीनगर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर चाकूने हल्ला; भेटायला बोलावलं अन्…

रिव्हर्स घेतलेल्या कारच्या धडकेत 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बापदेव महाराज ब्रिजवर एका कार चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे कार रिव्हर्स घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला, तर तिचे काका-काकू गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१९ मे) सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास स्वामी हॉटेलसमोरील हायवे रोडवर घडली आहे. स्वरा धावडे (वय १० वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणात अमित बाळकृष्ण धावडे (वय ४७, भिवंडी, ठाणे; मूळ गाव- नांदगाव पाली, सुधागड, रायगड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पजेरो स्पोर्ट कार (एमएच 43/एएन 9567) चालक प्रशांत यशवंत म्हात्रे (वय ४५, वाशी, पेन, रायगड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A woman was seriously injured in a collision with a four wheeler

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

सहकारनरमध्ये सोसायटीत घुसून टोळक्याची दहशत, कारची तोडफोड; 18 जणांवर गुन्हा दाखल
1

सहकारनरमध्ये सोसायटीत घुसून टोळक्याची दहशत, कारची तोडफोड; 18 जणांवर गुन्हा दाखल

दिघीतील ‘एमडी’च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई
2

दिघीतील ‘एमडी’च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु
3

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु

धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर…
4

धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.