Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde convoy accident: श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात; नांदेडमध्ये घडली घटना

या अपघातात वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून, घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली आणि ताफा पुढील प्रवासासाठी रवाना झाला.

  • By anuradha sagar
Updated On: May 28, 2026 | 04:19 PM
Nanded News, Shrikant Shinde, Accident Alert, Shivsena,

Nanded News, Shrikant Shinde, Accident Alert, Shivsena,

Follow Us
Follow Us:

Nanded News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यांतील चार वाहनांचा नांदेड शहरात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी खासदार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नांदेडहून नायगावकडे  निघाले होते. ‘शिव संवाद दौऱ्या’निमित्त नायगाव येथे पक्षाच्या आढावा बैठकीसाठी ते जात होते.

दरम्यान, शहरातून ताफा पुढे जात असताना साठे चौक येथे ताफ्यातील एका वाहनासमोर अचानक एक व्यक्ती आल्याने चालकाने तातडीने ब्रेक लावला. समोरील वाहनाने अचानक ब्रेक मारल्यामुळे मागील तीन वाहने एकमेकांवर आदळली.

या अपघातात वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र,  परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली आणि ताफा पुढील प्रवासासाठी रवाना झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट… दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा दिल्लीत तळ ठोकून !

नांदेड दौऱ्यावर असताना खासदार श्रीकांत शिंदेंनी नायगाव, मुखेड आणि देगलूर विधानसभा मतदारसंघांतील आढावा बैठका घेत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला. या दौऱ्यादरम्यान, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, ग्रामीण भागातील पक्ष विस्तार आणि जनसंपर्क अभियान या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, प्रत्येक गाव, वाडी आणि घराघरापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने मैदानात उतरावे. जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत स्थानिक प्रश्नांवर तत्काळ पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी ताकद आहे, ही ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे श्रीकांत शिंदेंनी सांगितले.

Matoshree call to Devendra Fadnavis: ‘मातोश्री’वरून थेट देवेंद्र फडणवीसांना फोन अन् झटका

 

तसेच एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत ठेवणे, नवीन मतदार नोंदणी करणे, युवा मतदार आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संपर्क वाढवणे, तसेच प्रत्येक बूथवर संघटनेची ताकद वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला.

बीएलए, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी बूथस्तरावर अधिक सक्रिय राहून संघटन मजबूत करण्यासाठी काम करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्वांनी पूर्ण क्षमतेने कामाला लागण्याचे आवाहनही श्रीकांत शिंदे यांनी केले.

 

 

 

 

Web Title: Shrikant shinde convoy accident nanded 2026 shiv samvad tour nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Accident News
  • nanded news
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात
1

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर…
2

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर…

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…
3

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…

दुर्दैवी ! महाराष्ट्राच्या दोन वकिलांचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू; सैन्याच्या वाहनाला दुचाकीची धडक
4

दुर्दैवी ! महाराष्ट्राच्या दोन वकिलांचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू; सैन्याच्या वाहनाला दुचाकीची धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.