Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara news : शाहू कलामंदिर की ठेकेदारांचा अड्डा? लाखो खर्चूनही सुविधा गायब? मनुष्यबळ व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह

साताऱ्यातील शाहू कलामंदिरात मनुष्यबळ व्यवस्थापनाचा गंभीर बोजवारा उडाल्याचे आरोप समोर आले आहेत. प्रकाश, ध्वनी आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी चार कर्मचारी नियुक्त असल्याचे दाखवले जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 19, 2026 | 02:39 PM
शाहू कलामंदिर की ठेकेदारांचा अड्डा? लाखो खर्चूनही सुविधा गायब? मनुष्यबळ व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह

शाहू कलामंदिर की ठेकेदारांचा अड्डा? लाखो खर्चूनही सुविधा गायब? मनुष्यबळ व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • लाखोंचा पगार खर्च तरी कलाकारांना मनस्तापच
  • ध्वनी-प्रकाश व्यवस्थेचा बोजवारा
  • प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव
  • पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह
सातारा : साताऱ्यातील प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचे प्रमुख केंद्र मानल्या जाणाऱ्या शाहू कलामंदिरातील मनुष्यबळ व्यवस्थापनाचा गंभीर बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रकाश व्यवस्था, ध्वनी व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थापक अशा महत्त्वाच्या पदांसाठी चार कर्मचारी नियुक्त असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात फक्त दोनच कर्मचारी उपस्थित राहतात, तर उर्वरित कर्मचारी “घरबसल्या पगार” घेत असल्याची तक्रार रंगकर्मी आणि नाट्यसंस्थांनी केली आहे.

शाहू कलामंदिराची संपूर्ण व्यवस्था एका राजकीय संबंध असलेल्या खासगी ठेकेदाराकडे देण्यात आली असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा लाखो रुपये खर्च होत असतानाही नाट्यप्रयोगासाठी येणाऱ्या कलाकारांना कोणतीही सक्षम तांत्रिक सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे, ध्वनी व्यवस्थापक आणि प्रकाश नियोजक ही अत्यंत तांत्रिक व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची पदे असताना येथे अनुभवहीन आणि कामचलाऊ कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जात असल्याचे समोर आले आहे. परिणामी, नाट्यप्रयोगादरम्यान ध्वनी विस्कळीत होणे, प्रकाशयोजनेत त्रुटी राहणे आणि संवाद प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे न पोहोचणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने नाट्यसंस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनो, सरकारला कांदा विकू नका! अनिल घनवट यांचे ‘नाफेड’च्या खरेदीवर बहिष्काराचे आवाहन

पालिकेचे अधिकारी शैलेश अष्टेकर हे प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळत असले तरी त्यांच्या व्यवस्थापनाखालील कर्मचारी रचना आणि ठेकेदारी पद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “व्यवस्था कागदावर आणि कर्मचारी हवेत” अशी उपरोधिक प्रतिक्रिया रंगकर्मींकडून व्यक्त होत आहे.

शाहू कलामंदिर हे साताऱ्याच्या सांस्कृतिक ओळखीचे केंद्र मानले जाते. मात्र आज या ठिकाणी कलाकारांच्या सुविधेपेक्षा ठेकेदारांची आर्थिक सोय महत्त्वाची बनली आहे काय, असा संतप्त सवाल रंगकर्मी उपस्थित करत आहेत. “हे कलामंदिर आहे की ठेकेदाराचा पगार काढण्याचे केंद्र?” असा थेट प्रश्न आता विचारला जात आहे.
रविवारी नगरसेवकांच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यातील ठेकेदारी व्यवस्थेवर कठोर भाष्य करत ही पद्धत मोडून काढण्याचे आवाहन केले होते. त्याची सुरुवात सातारा नगरपालिकेने शाहू कलामंदिरापासून करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक, पारदर्शक मनुष्यबळ व्यवस्थापन आणि ठेकेदारी कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी साताऱ्यातील रंगकर्मी आणि नाट्यसंस्थांकडून करण्यात येत आहे.

स्वारगेट ते कात्रज मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करा; रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

Web Title: Shahu kalamandir satara manpower mismanagement home salary allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara News

संबंधित बातम्या

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
1

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका
2

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान
3

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर
4

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.