Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

शामगाव (ता. कराड) येथे अन्न सुरक्षा विभागाने भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या दाम्पत्यावर मोठी कारवाई केली. कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास भेसळीच्या संपूर्ण साखळीपर्यंत सुरू आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 27, 2026 | 09:12 PM
शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

Follow Us
Follow Us:

मसूर : शामगाव ता कराड येथील भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला रंगेहात पकडले. या कारवाईत भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी, श्रीमती वंदना विठ्ठल रुपणवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील मसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दूध भेसळीविरोधात अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाने पहिल्यांदाच मोठी कारवाई केली आहे.

२७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ८.३० वाजता शामगाव गावच्या हद्दीतील ओंकनाथ मंदिराच्या मागे यशवंत फाटक यांच्या राहत्या घरावर अन्न सुरक्षा विभागाने मसूर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. या वेळी महेश यशवंत फाटक (वय ४४) व स्वाती महेश फाटक (वय ३८), रा. शामगाव, ता. कराड हे भेसळयुक्त दूध तयार करताना आढळून आले.

कारवाई दरम्यान केशरी रंगाच्या किटलीतील ३ लिटर व गुलाबी रंगाच्या किटलीतील २ लिटर म्हशीचे दूध, रिफाइंड पामोलीन तेल, पांढऱ्या रंगाची संशयित पावडर, पांढऱ्या रंगाचे द्रव, सुजाता कंपनीचा मिक्सर व त्याचे भांडे, सुमित कंपनीचा हँड ब्लेंडर आदींसह भेसळीसाठी वापरण्यात आलेले सुमारे ₹६,९७१ किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. कृत्रिम म्हशीचे दूध, रिफाइंड पामोलीन तेल, संशयित पावडर व तयार केलेले द्रव हे मानवी आरोग्यास घातक व असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सर्व नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले.

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक

संशयित पुरवठादार व भेसळयुक्त दूध कोणतीही चाचणी न करता स्विकारणारे ओम डेअरी, राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथील संचालक, मालक व भागीदार यांनी जाणीवपूर्वक संगनमत करून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भेसळीसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा पुरवठादार कोण आहे, याची माहितीही आरोपींकडून देण्यात आली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ही कारवाई उंब्रज पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे सपोनि पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भोसले, हवालदार महेश लावंड, बाळासो कोळेकर, सुनील पन्हाळे, अशोक पाटील, सुप्रिया इंगवले यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि पंकज पवार करीत आहेत.

Satara News: मेढा सोसायटीत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची बाजी; डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर

या प्रकरणाचा तपास आता भेसळीच्या संपूर्ण साखळीपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सुरू आहे. पुरवठादार, दूध संकलन व वितरण व्यवस्थेतील संबंधित व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रॅकेटमधील आणखी काही जण तपासाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Shamgaon milk adulteration case couple arrested karad food safety action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • Karad news
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
2

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील
3

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
4

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.