शिराळा: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर (Central Government) घणाघाती टीका केली आहे. आज देशाचं राजकारण (Politics In India) वेगळ्या दिशेला जात आहे. तर राज्य सरकार वेगळ्या विचारानं काम करत आहे. आजपर्यंत माणसं जोडण्याचं काम झालं. पण आज धर्माच्या नावाने अंधार पसरवण्याचं काम सुरू आहे. देशासाठी जे हुतात्मा झाले त्यांच्यावर टीका करणारे नेतृत्व देशात बघायला मिळत आहे. त्यामुळे देशात अस्वस्थता आहे, असं सांगतानाच आपल्याला आता धर्मांध शक्तींविरोधात काम करावं लागणार आहे. विकासात्मक राजकारणाची या देशाला गरज आहे. राजकारणसुद्धा सर्वसामान्यांना न्याय देणारं हवं, असं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राज्याचा विकास होत असल्याचंही ते म्हणाले.शरद पवार हे शिराळा (Sharad Pawar In Shirala) येथे बोलत होते.
[read_also content=”‘भिरकीट’ १७ जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरमुळे वाढली चित्रपटाविषयीची उत्सुकता https://www.navarashtra.com/movies/bhirkit-film-will-be-released-on-17th-june-poster-out-on-gudipadwa-nrsr-263222.html”]
शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला केला. नव्या वर्षाची आज सुरुवात होत आहे. नाईक यांनी पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीला हातभार लावण्याचा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच स्वागत आज आपण करतोय. योग्य असेल तर स्वागत करणार. नसेल तर पडेल ती किंमत मोजणार असा हा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा इतिहास शिराळा शिवाय पूर्ण होत नाही. शिवाजीराव जिल्हा परिषदेचे यशस्वी अध्यक्ष राहिले आहेत. आज ते पुन्हा घरी येताहेत. घराचं रक्षण करण्याचं सूत्रं त्यांनी स्वीकारलंय. त्यांचं मी स्वागत करतो. नाईक यांच्या अनुभवाचा उपयोग राज्य पातळीवर कसा करून घेता येईल याचा विचार झाला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.