सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट (फोटो- सोशल मीडिया)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
पवारांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी
सुनील तटकरे यांनी साधला माध्यमंशी संवाद
मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशीची मागणी केली जात आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी पार्थ पवार, सुनील तटकरे देखील उपस्थित असल्याचे समजते आहे. ही भेट कशासाठी घेतली गेली याचे कारण आता समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली. त्याबाबत त्यांना एक निवेदन देण्यात आले आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपघातासंदरर्भात विमान अपघात ब्यरोकडून पहिल्यांदाच महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डवर आगीचा दुष्परिणाम झाल्यामुळे रेकॉर्डरचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळही माजली असून पुन्हा एकदा या अपघातासंदर्भात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
विमान अपघात तपास ब्युरोकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, विमान कोसळल्यामुळे विमानाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अजित पवार यांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते. बराच वेळ आगीत जळाल्यामुळे या रेकॉर्डरचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात ब्युरो यशस्वी झाली . कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचा डेटा रिकव्हर कऱण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. हे रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून संबंधित देशातील प्रतिनिधींची मदत मागवण्यात आली आहे. तर्कवितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन तपास ब्युरोकडून देण्यात आले आहे. ब्युरो इंटरनॅशनल स्टॅडर्डनुसार तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स ही त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे साहित्य मानले जाते. ब्लॅक बॉक्स हे रेकॉर्डिंग डिव्हाईस असून. त्यात विमान उड्डाणादरम्यान, कॉकपीटमध्ये झालेल्या संभाषणाची आणि उड्डाणाचे डेटा रेकॉर्ड केला जातो.






