Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक; शरद पवारांकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस

बाबा आढाव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी उपचार प्रक्रियेबाबत माहिती घेतली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2025 | 04:32 PM
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक; शरद पवारांकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक; शरद पवारांकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस

Follow Us
Close
Follow Us:
  • समाजसेवक बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक
  • शरद पवारांनी घेतली प्रकृतीची माहिती
  • सर्व मदत करण्याची तयारी दर्शविली
पुणे : राज्यातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पुण्यातील पुना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या दहा दिवसांपासून डॉक्टरांच्या सततच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत अधूनमधून चढ-उतार होत असल्याने समर्थक व सामाजिक वर्तुळात मोठी चिंता निर्माण झाली आहे. आढाव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी वैद्यकीय पथकाशी सविस्तर चर्चा करून उपचार प्रक्रियेबाबत माहिती घेतली. तसेच कुटुंबीयांना धीर देत आवश्यक ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शविली.

 

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाशी संबंधित त्रास वाढल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि त्यांच्या टीमकडून उपचार सुरू असून, सध्या प्रकृती स्थिर असली तरी पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आढाव यांच्या कुटुंबीयांनी जनतेला कोणत्याही अफवा न पसरविण्याची विनंती केली आहे. अधिकृत किंवा कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या माहितीलाच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.

कामगार, कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर काम करणारे बाबा आढाव यांचे स्वास्थ्य लवकर सुधारावे, यासाठी राज्यभरातून प्रार्थना व्यक्त होत आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते, कामगार संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करून लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे. कष्टकऱ्यांचे नेते म्हणून बाबा आढाव यांना ओळखलं जातं असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन कामगार संघटना आणि वंचितांच्या हक्कांसाठी समर्पित केलं आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात अभ्यासिकांसाठी नियंत्रण नियमावली हाेणार; नेमकं काय करणार उपाययाेजना?

Web Title: Sharad pawar inquired about the treatment process of baba adhav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Baba Adhav
  • pune news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?
1

ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?

पुण्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांनी अनुभवले भारतीय सैन्याचे सामर्थ्य
2

पुण्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांनी अनुभवले भारतीय सैन्याचे सामर्थ्य

पुणे मेट्रो लाईन-2 च्या रामवाडी-वाघोली विस्ताराला गती; आता 4.7 किमीचा सहापदरी एलिव्हेटेड रस्ता उभारणार
3

पुणे मेट्रो लाईन-2 च्या रामवाडी-वाघोली विस्ताराला गती; आता 4.7 किमीचा सहापदरी एलिव्हेटेड रस्ता उभारणार

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत
4

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.