संग्रहित फोटो
पुण्यात राज्यभरातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी शहरात राहत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक क्लासेस तसेच अभ्यासिकांची संख्या शहरात वाढत आहे. त्यामुळे अनधिकृत पथारी, स्टाॅलधारक व्यावसायिकायांची संख्या वाढून अतिक्रमणात भर पडली आहे. याचा त्रास स्थानिक पुणेकरांना हाेऊ लागला आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत पृथ्वीराज बी पी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनधिकृत अभ्यासिका आणि पेईंग गेस्ट यांच्यासाठी नियंत्रण नियमावली करण्याचे ठरले. तसेच इतर काही निर्णय घेण्यात आले.
या बैठकीस अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर, परिमंडळ क्र. ०५ उपायुक्त निखील मोरे, कसबा-विश्रामबागवाडा सहाय्यक आयुक्त प्रदिप आव्हाड, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कर्पे, मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश शेलार, कर आकारणी व कर संकलन विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी क्रॉंग्रेस पक्षाचे प्रतिनिधी राहुल देखणे आदी उपस्थित होते. बैठकीत स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत चर्चा झाली.
शहरात साडे सातशेहून अधिक अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत. नवी पेठेतील अभ्यासिकेला आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला होता. त्यावर महापालिकने शहरातील अभ्यासिकांचे सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल तात्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना सादर करण्यात आला होता. तसेच अग्नीशमन दलाकडूनही अभ्यासिंकाचे फायर ऑडिट पूर्ण केले जाणार होते. मात्र यावर पुढे कार्यवाही करण्यास प्रशासनाने उदासीनता दाखविली.
पुणे शहरातील मुख्य भागात, पेठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. तसेच खानावळी, हॉटेल व्यावसायिकांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलले आहे. तर ठिकठिकाणी खाऊ गल्ल्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी मोठ्या प्रमाणात असते. याचा त्रास अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. महापालिकेला कर भरुन देखील सुविधा मिळत नाहीत. तसेच बाहेरुन आलेल्यांचा त्रास का सहन करावा, अशा तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पुढील १० ते १५ दिवसात पोलिस अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे. याबाबतची आढावा बैठक पुन्हा १७ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.
काय करणार उपाययाेजना?






