Shashikant Shinde new State President of Sharad Pawar’s NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागण्या सातत्याने वाढल्या होत्या. त्यांनंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनीदेखील आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी केली होती.
गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाचा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनी झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी थेट मागणी पक्ष प्रमुख शरद पवार यांच्याकडे केली होती.
Maharashtra Band: ‘भारत बंद’ पाठोपाठ आता ‘महाराष्ट्र बंद’; आहार संघटनेकडून बंद’ची हाक
गेल्या महिन्यात पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले होते की, “ शरद पवार साहेबांनी मला बरीच संधी दिली. जवळपास सात वर्ष मी प्रदेशाध्यक्षपदी राहिलो. पण आता पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. अशी माझी विनंती आहे. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी याविषयी योग्य निर्णय घ्यावा.” तेव्हापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू होत्या, तसेच, नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याबाबतही अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमानंतर माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नव्या नेतृत्वाच्या शोधाला गती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) अंतर्गत बदलांचे वारे वाहू लागले असताना, दोन महत्त्वाची नावे चर्चेत होती. यातील पहिले नाव म्हणजे राजेश टोपे आणि दुसरे नाव म्हणजे शशिकांत शिंदे. त्यानंतर अखेर प्रदेशाध्यक्षपदासााठी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली.
तुर्कीची S-400 पाकिस्तानला विकण्याची योजना; काय असणार अमेरिका आणि इस्रायलची भूमिका?
दुसरीकडे, शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातील अनुभवी नेते असून सातारा आणि नवी मुंबई भागात त्यांचा मजबूत प्रभाव आहे. ते पक्षातील संघटनात्मक कामासाठी ओळखले जातात आणि आक्रमक पद्धतीने नेतृत्व करू शकतात, असे मानले जाते. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्याही नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.
शशिकांत शिंदे हे एक माथाडी नेते असून मुंबई हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. महत्त्वाचे म्हणजे ते शरद पवारांचे विश्वासू नेते अशीही त्यांची ओळख आहे. त्यानंतर 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर जावळी मतदारसंघावर आपले वर्चस्व वाढवण्यासाठी शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना जावळीला पाठवले. शिंदे यांनीदेखील जावळीचा गड यशस्वीपणे सर करत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. तेव्हापासून ते जावळीच्या राजकारणात त्यांचे प्रभाव आणि वर्चस्वही वाढू लागला. त्यानंतर कोरेगावच्या आमदार शालिनीताई पाटील यांनीदेखील शरद पवारांना आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या. तेव्हा पवारांनी पुन्हा शिंदे यांना कोरेगावात पाठवून शालिनीताईंचा पराभव केला. पण गेल्या मागील काही निवडणुकीत कोरेगावच्या महेश शिंदे यांच्याकडून मात्र शशिकांत यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यानंतरही शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना ताकद देत त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यामुळे शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचे मानले जाते.