अहमदनगर : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान कालच पार पडले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 11 जागांवर काल मतदान झाले. आज अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेत, पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात हा आत्मा शेतकरी, गरिबांसाठी ५० वर्षे नाही तर ५६ वर्षांपासून हिंडतोय, असा जोरदार पलटवार मोदींवर करीत चांगलेच सुनावले.
अतृप्त आत्म्याच्या टीकेवर जोरदार पलटवार
अहमदनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या अतृप्त आत्म्याच्या टीकेवर जोरदार पलटवार केला. मोदींना उत्तर देताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचं वर्ष मोजण्याची चुकीसुद्धा काढली. दरम्यान, मोदी हे राज्यात प्रचार सभेत बोलताना माझ्यावर किंवा उद्धव ठाकरेंवर टीका करतात. कारण त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे नाहीत पंतप्रधान मोदींना सांगायचंय, राज्यात हा आत्मा ५० वर्षे नाही तर ५६ वर्षांपासून फिरत आहे. कारण मला राज्यातील विधानसभेत येऊन यंदा ५६ वर्षे झाली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक प्रचारसभेत बोलतांना शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. गेली पन्नास वर्ष एक आत्मा महाराष्ट्रात फिरत असल्याची टीका मोदींनी केली होती.